नवी दिल्ली : बिहारची राजधानी पटणा येथे अतिक्रमणे हटविण्यासाठी गेलेल्या पथकावर नागरिकांनी हल्ला केल्याची घटना घडली. जमाव इतका प्रक्षुब्ध झाला होता की, परिस्थिती नियंत्रणासाठी पोलिसांना गोळीबार करावा लागला.
पटणा येथील राजीव नगर परिसरातील सरकारी जमीनीवर गेल्या काही दिवसांपासून लोक बेकायदेशीररित्या राहात होते. काहींनी घरे बांधली होती. येथील अतिक्रमणे हटविण्यासाठी प्रशासनातील अधिकाऱ्यांचे एक पथक गेले होते. यावेळी नागरिकांनी या अधिकाऱ्यांवर हल्ला केला. पाहता पाहता दंगा इतका वाढत गेला की परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली. अखेर परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी पोलिसांना गोळीबार करण्याचा निर्णय घ्यावा लागला.
Clash between locals and Police during an anti-encroachment drive in Patna. Many people injured. Police fire several rounds. pic.twitter.com/BLMF780FvH
— ANI (@ANI) September 5, 2017
#Visuals Clash between locals and Police during an anti-encroachment drive in Bihar's Patna. Many people injured. Police fire several rounds pic.twitter.com/QUhv5aNMJW
— ANI (@ANI) September 5, 2017
लोकांनी पोलिसांच्या गाडीला आग लावली. महिलांनी जेसीबी मशीनवर दगडफेक केली. यात एसडीएमच्या गाडीची काच फुटली. या घटनेत काही लोक गंभीर जखमी झाले आहेत. मात्र, त्यांची संख्या अद्याप समजू शकली नाही.