Watch: क्लास टीचरने बोरिंग क्लासला असं केलं रोमांचक, Student सोबत लावले ठुमके

Trending News: दिल्लीच्या सरकारी शाळेतील शिक्षकाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्या व्हिडिओमध्ये तिच्या  Studentसोबत डान्स करताना दिसत आहे.

Updated: Apr 28, 2022, 12:24 PM IST
Watch: क्लास टीचरने बोरिंग क्लासला असं केलं रोमांचक, Student सोबत लावले ठुमके title=

 मुंबई : Class Teacher Dance with Student: सोशल मीडियावर अनेक प्रकारचे व्हिडिओ समोर येतात, ज्यामध्ये अनेक मनोरंजक आणि अनेक हृदय जिंकणारे व्हिडिओ असतात. सध्या सोशल मीडियाव एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून युजर्स आश्चर्यचकित झाले आहेत आणि त्यांच्या चेहऱ्यावर आनंद स्पष्ट दिसत आहे. व्हिडिओमध्ये एक शिक्षक वर्गात एका मुलीसोबत डान्स करताना दिसत आहे.

शाळेच्या दिवसात आपण सर्वांनी खूप धमाल केली असेल, कधी यासाठी शिक्षकांची नक्कल केली असेल. तर कधी शिव्यांचा आधार घेतला असेल. आता काळ खूप बदलला आहे. शिक्षक आता मुलांशी अतिशय कठोर वागत नाहीत. जेणेकरुन ते एकाचवेळी अधिकाधिक विद्यार्थ्यांचे आवडते होतात आणि विद्यार्थी त्यांचे म्हणणे मांडू शकतात.

सध्या असाच एका शिक्षकेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये शिक्षका आपल्या विद्यार्थीनीसोबत डान्स करताना दिसत आहे. या शिक्षिकेने एक धाडसी पाऊल उचलताना बोरिंग क्लासला डान्स करत रोमांचक  बनवले. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये दिल्लीतील एका सरकारी शाळेतील इंग्रजी शिक्षिका आपल्या विद्यार्थिनीसोबत डान्स करताना दिसत आहे.

हा व्हिडिओ मनू गुलाटीने त्याच्या ट्विटर अकाउंटवरुन शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये मुलीने तिच्या डान्स स्टेप्स दाखवताच गुलाटीही त्यांची कॉपी करताना दिसत आहे. ज्यावर इतर विद्यार्थी आपल्या शिक्षकांसाठी टाळ्या वाजवताना दिसत आहेत. सध्या सोशल मीडियावर या व्हिडिओला जवळपास 60 हजार व्ह्यूज मिळाले आहेत. त्याचवेळी 3 हजार युजर्सनी व्हिडिओला लाईक केले आहे. बहुतेक युजर्सनी शिक्षिकेचे त्यांच्या मनमिळाऊ स्वभावाचे कौतुक करताना दिसत आहेत.