जयपूर : राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांची एका कार्यक्रमाच चांगलीच फजिती झाली. आपल्या शासनकाळात कशी पारदर्शकता आहे हे दाखवण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी जेव्हा एक प्रश्न विचारला. तेव्हा त्या प्रश्नाच्या उत्तराने त्यांना मान खाली घालावी लागली.
राजस्थानची राजधानी जयपूरच्या बिर्ला सभागृहात मुख्यमंत्री राज्यस्तरीय शिक्षक सन्मान सोहळ्याला संबोधित करत होते.
संबोधन करत असताना अशोक गहलोत यांनी म्हटलं की, ट्रान्सफर आणि पोस्टिंगबाबत कशा प्रकारे त्यांच्या सरकारने पारदर्शकता आणली आहे. त्यांनी सर्वांना विचारलं की, आमच्या सरकारमध्ये ट्रान्सफर आणि पोस्टिंगसाठी पैसे लागतात का?
सीएम गहलोत यांच्या या प्रश्नानंतर सर्वांना 'हा' असं उत्तर दिलं. त्यानंतर गहलोत यांचा चेहरात उतरला. त्यांनी पुन्हा प्रश्न केला की, पैसे लागतात? त्यावर शिक्षकांनी पुन्हा हा असंच उत्तर दिलं. यावेळी मंचावर शिक्षण मंत्री गोविंद सिंह डोटासरा देखील उपस्थित होते.
यानंतर त्यांनी म्हटलं की, कोणी पैसे मागत असेल तर येऊन सांगा. त्यांनी परिस्थिती सांभाळण्याचा प्रयत्न केला.