curruption

आताची मोठी बातमी! कामगार खात्याच्या कपाटात चोर, शेकडो कोटींच्या घोटाळ्याचा भांडाफोड

कामगार मंडळातल्या बड्या अधिकाऱ्यांनी केंद्रीय भांडारला हे कंत्राट देण्यासाठी धक्कादायक कारनामे केले आहेत. वस्तूंची पाच पट चढ्या किमतीनं खरेदी करून बडे बाबू आणि कंत्राटदारानं दोन-चार नव्हे तर तब्बल शेकडो कोटींचा डल्ला मारल्याचं झी 24 तास इन्व्हेस्टीगेशनमध्ये समोर आलंय.

Aug 29, 2023, 05:19 PM IST

पीक विम्यात भ्रष्टाचाराच सेतू! नाव शेतकऱ्याचं, बँक खातं सेतू चालकाचं... पाहा कसं लुबाडलं जातंय

पीक विमाच्या नावानं शेतकऱ्यांना लुबाडलं जातंय. शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईसाठी पीक विमा योजना लागू करण्यात आलीय. मात्र सेतू चालक शेतकऱ्यांची दिशाभूल करून त्यांना गंडा घालत असल्याचा धक्कादायक प्रकार उघड झालाय. पीक विम्यातला भ्रष्टाचाराचा सेतू ठरलेल्या या केंद्रांचा भांडाफोड करणारा हा रिपोर्ट.... 

Aug 9, 2023, 09:57 PM IST
Chagan Bhujbal Reaction On Misnisters Expenses Over Treatment PT1M47S

ठाकरे-पवार सरकार बदमाश सरकार, किरीट सोमय्या यांची टीका

हसन मुश्रीफ यांच्यावर घोटाळ्याचा आरोप, ठाकरे सरकार कारवाई करणार का?  किरीट सोमय्या यांचा सवाल

Apr 1, 2022, 06:48 PM IST

मुख्यमंत्र्यांनी मोठ्या उत्साहात विचारला प्रश्न, लोकांचं उत्तर ऐकून चेहराच पडला

मुख्यमंत्र्यांची आपल्या सरकारची वाह-वाह करताना एका प्रश्नामुळे फजिती झालेली पाहायला मिळाली.

Nov 16, 2021, 09:12 PM IST

भाग -५ : मुंबई मनपाच्या भ्रष्ट कारभाराची पोलखोल

 गैरव्यवहार कुणाला समजणारच नाही याची दक्षता महापालिकेनं घेतली आहे. 

Jul 12, 2019, 07:34 PM IST

नाशिकचे विभागीय आयुक्त महेश झगडे यांची तडकाफडकी बदली

नाशिकचे विभागीय आयुक्त महेश झगडे यांची तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. निलांबिका मंदिराच्या जागेच्या गैरव्यवहाराची चौकशी त्यांनी सुरू केली होती.

Feb 28, 2018, 07:25 PM IST

जलयुक्त शिवार भष्ट्राचार प्रकरणी चौघांच्या निलंबनाची शिफारस

 जलयुक्त शिवार भष्ट्राचार प्रकरणी चौघांच्या निलंबनाची शिफारस करण्यात आली आहे. झी 24 तासनं या बातमीचा पाठपुरावा केल्यानंतर ही शिफारस करण्यात आली आहे.

May 27, 2017, 12:25 PM IST

विजय कुमार गावित यांच्या अडचणी वाढल्या

माजी आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित यांच्या मंत्रीपदाच्या स्वप्नांना मोठा झटका बसला आहे. २००४ ते २००९ या काळात गावित मंत्रीपदी असतना आदिवासी विकास विभागात कोट्यवधींचा भ्रष्टाचार झाल्याचा ठपका गावितांवर ठेवण्यात आला आहे.

May 6, 2017, 11:24 AM IST

सरकारी कर्मचाऱ्यांनी डेबिट कार्ड बाळगणे अनिवार्य

नोटाबंदीच्या निर्णयानंतर कॅशलेस अर्थवस्थेला चालना देण्यासाठी मध्यप्रदेश सरकार सर्व सरकारी कर्मचाऱ्यांना डेबिट कार्ड बाळगणे अनिवार्य करणार आहे. बँकांच्या माध्यमातून डेबिट कार्ड वापराचे प्रशिक्षण सरकारी कर्मचाऱ्यांना देण्यात येणार आहे.

Dec 8, 2016, 09:06 PM IST

संशयीत दहशतवाद्यांकडून बँकेत १० लाखाचा दरोडा

श्रीनगर: दक्षिण कश्मिरमधील पुलवामा जिल्ह्यातील काही अज्ञात संशयित दहशतवाद्यांनी गुरूवारी एका बँकेत दरोडा टाकून १० लाखाची रोकड पळवली.

बँक कर्मचारी आणि सुरक्षा रक्षकांना चकवा देऊन आरोपी पसार झाले आहेत. आरोपींना शोधण्यासाठी पोलिसांची तपास मोहिम चालू असल्याची माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आहे.

Dec 8, 2016, 08:52 PM IST