चंदीगड : दोन साध्वींवर बलात्कार प्रकरणी राम रहिमला सीबीआय कोर्टाने १० वर्षाची शिक्षा सुनावली आहे. हरियाणा सरकारने राज्यात सुरक्षा व्यवस्थेची स्थिती जाणून घेण्यासाठी आपात्कालीन बैठक बोलावली आहे. मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर या बैठकीचं नेतृत्व करणार आहेत. या बैठकीत राज्यात हिंसा पसरु नये म्हणून योग्य ती सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. याबाबत चर्चा करुन योग्य ते आदेश दिले जाणार आहेत.
तीन दिवसापूर्वी २५ ऑगस्टला जेव्हा सीबीआय कोर्टाने राम रहिमला बलात्काराच्या आरोपात दोषी ठरवलं होतं तेव्हा पंचकुलासह हरियाणाच्या वेगवेळ्या जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात हिंसा झाली होती. या हिंसेमध्ये मोठ्या प्रमाणात गाड्या जाळल्या गेल्या होत्या आणि लाखोंचं नुकसान झालं होतं. त्यामुळे आता सरकार अशा गोष्टी पुन्हा घडू नये म्हणून उपाययोजना करत आहे.