देहारदून : उत्तराखंडचे (Uttarakhad) मुख्यमंत्री तीरथसिंग रावत (Tirath Singh Rawat) यांनी आणखी एक वादग्रस्त विधान केलंय. कोरोना काळात (COVID-19) लोकांना जास्त रेशन मिळवायचे होते तर त्यांनी दोनपेक्षा अधिक मुलं जन्माला घालायला हवी होती. नैनीताल जिल्ह्यातील रामनगर येथे एका कार्यक्रमादरम्यान मुख्यमंत्री रावत बोलताना त्यांची जीभ घसरली. कोरोना पॉझिटीव्ह असलेल्यांना प्रति युनिट पाच किलोग्राम रेशन देण्यात आले आणि ज्यांना २० मुले होती त्यांना देखील एक क्विंटल रेशन मिळाले. तर ज्यांना दोन मुले होती त्यांना दहा किलोग्रॅम रेशन मिळाला.
'ज्यांची 10 मुलं होती त्यांना 50 किलो आले. ज्यांची 20 मुलं होती त्यांना एक क्विंटल मिळाले. दोन होते आणि 10 किलोग्रॅम रेशन मिळाल्याने लोकांनी दुकानं बनवली आणि खरेदी करणारे शोधले असे मुख्यमंत्री म्हणाले.
त्यांनी एवढा चांगला तांदूळ यापूर्वी कधीच खाल्लेला नव्हता आणि लोकांमध्ये हेवा वाटू लागला की जेव्हा वेळ होता तेव्हा २ अपत्य का जन्माला घातली ? 20 का नाही ? असे ही ते पुढे म्हणाले.
यामध्ये दोषी कोण आहे? जेव्हा त्याने 20 जणांनाला जन्म दिला, तेव्हा त्याला एक क्विंटल मिळाले. आता त्याचा त्याचा हेवा वाटतो. जेव्हा वेळ आली तेव्हा तुम्ही फक्त दोनच निर्माण केले, 20 जण का नाही? असा बिनबुडाचा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
भारत ब्रिटनऐवजी अमेरिकेचा गुलाम
याच कार्यक्रमात मुख्यमंत्री रावत यांनी आणखी एक विधान केले. यामध्ये त्यांनी भारत हा 200 वर्षे अमेरिकेचा गुलाम होता असे म्हटले. कोरोना काळात त्यांची शक्ती देखील कमी झाली असे ते म्हणाले.
"जिथे आम्ही २०० वर्षे अमेरिकेचे गुलाम होतो, तिथे संपूर्ण जगावर त्यांनी राज्य केले. ते म्हणायचे की सूर्य त्यांच्या राजवटीखाली कधीच लपून राहिला नाही, परंतु आजच्या काळात तो देशही हादरला आहे. 135 कोटी लोकसंख्या असलेला भारत देश आज इतर देशांची अपेक्षा पूर्ण करतोय हे जगाने मान्य केलंय. असेही ते म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात हे शक्य झाल्याचे ते म्हणाले.