'मुख्यमंत्री राजीनामा देणार, त्यांची पत्नी मुख्यमंत्री होणार'; BJP खासदाराच्या दाव्याने खळबळ

CM Wife To take Oath As Chief Minister Claims BJP MP: राज्याच्या राजकारणामध्ये मोठा भूकंप होणार असल्याची शक्यता एका आमदाराने पदाचा तडकाफडकी राजीनामा दिल्याने सुरु झाल्यात.

स्वप्निल घंगाळे | Updated: Jan 2, 2024, 02:28 PM IST
'मुख्यमंत्री राजीनामा देणार, त्यांची पत्नी मुख्यमंत्री होणार'; BJP खासदाराच्या दाव्याने खळबळ title=
भाजपा खासदाराचा मोठा दावा

CM Wife To take Oath As Chief Minister Claims BJP MP: नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी म्हणजे 1 जानेवारी 2024 ला गांडेयमधून झारखंड मुक्ती मोर्चाचे आमदार असलेल्या सरफराज अहमद यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला आहे. सक्तवसुली संचालनालयाने म्हणजेच ईडीने सातव्यांदा समन्स पाठवल्यानंतर अहमद यांनी राजीमाना दिल्याने भविष्यात झारखंडच्या राजकारणामध्ये मोठा भूकंप होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अहमद यांच्या राजीनाम्याने राजकीय भूकंपाची शक्यता अधिक ठामपणे व्यक्त केली जातेय. सत्ताधारी झारखंड मुक्ती मोर्चाचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या अडचणीही ईडीमुळे वाढल्या तर त्यांची पत्नी कल्पना सोरेन मुख्यमंत्री बनू शकतात अशी चर्चा आहे. सध्या कल्पना यांच्याकडे हेमंत सोरेन यांच्या जागी मुख्यमंत्रीपदाचा पर्याय म्हणून पाहिलं जात आहे. यापूर्वी कल्पना सोरेन यांनी एसटीसाठी राखीव जागेवरुन निवडणूक न लढता गांडेयसारख्या खुल्या प्रवर्गासाठीच्या जागेची निवड केली होती. 

बदलाचे संकेत

सत्ताधारी दलातील सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जर ईडी किंवा राजभवनाकडून मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्याविरुद्ध काही कारवाई करण्यात आळी तर सत्तेच्या चाव्या कल्पना सोरेन यांच्याकडे जाण्याची शक्यता अधिक आहे. काही दिवसांपूर्वी म्हणजेच रविवारी अचानक मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्याबरोबर कल्पना सोरेन विधानसभेत पोहोचल्या होत्या. कल्पना यांनी अशाप्रकारे अचानकपणे विधानसभेत येणं हे बदलाचे संकेत मानले जात आहेत. झारखंड मुक्ती मोर्चामध्ये हेमंत सोरेन यांची जागा घेण्यासाठी संभाव्य उमेदवार म्हणून जोबा मांझी, चंपई सोरेन आणि सविता महतो यांच्या नावाचीही वेळोवेळी चर्चा राहिली आहे.

पक्षाने केली संपूर्ण तयारी

सध्याच्या परिस्थितीमध्ये हेमंत सोरेन यांची पत्नी कल्पना सोरेन या मुख्यमंत्री होण्याच्या शर्यतीत आघाडीवर दिसत आहेत. मात्र हे सारं काही ईडी बडगाई अंचलमधील जमीनीशीसंबंधित प्रकरणामध्ये ईडी हेमंत सोरेन यांची चौकशी करुन काय कारवाई करणार यावर अवलंबून आहे. मात्र झारखंड मुक्ती मोर्चाने कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्यासाठी संपूर्ण तयारी केली आहे. 

भाजपा खासदाराचाही दावा

अंतर्गत बऱ्याच गोष्टी सुरु असल्याचा अंदाज यावरुन बांधता येतो की सरफराज अहमद यांच्या राजीनाम्याची कल्पना पक्ष नेत्यांना आणि इतर पदाधिकाऱ्यांनाही नव्हती. काँग्रेसचे मंत्री आणि आमदारांनाही या निर्णयाने घक्का बसला आहे. सरफराज अहमद यांना भविष्यात गिरिडीह लोकसभेची जागा किंवा राज्यसभेची जागेवरुन संधी मिळू शकते. दुसरीकडे भाजपाचे खासदार निशिकांत दुबे यांनीही कल्पना सोरेन मुख्यमंत्री होती अशी शक्यता व्यक्त केली आहे.

दुबे यांनी मुंबई उच्च न्यायालयामध्ये कटोल विधानसभेच्या जागेचासंदर्भ देत गांडेयमध्ये निवडणूक होणार नाही असं सूचित केलं आहे.