पेट्रोल आधीचं CNGच्या दरात वाढ, आजपासून मोजावे लागतील एवढे पैसे

रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धाचे परिणाम सर्व सामान्यांच्या रोजच्या आयुष्यावर...  

Updated: Mar 8, 2022, 08:39 AM IST
पेट्रोल आधीचं CNGच्या दरात वाढ, आजपासून मोजावे लागतील एवढे पैसे title=

मुंबई : रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धाचे परिणाम सर्व सामान्यांच्या आयुष्यावर होताना दिसत आहे. जर तुम्ही सीएनजी कार चालक असाल तर, तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे. इंधनांच्या दरांत वाढ होताना दिसत आहे. महत्त्वाचं म्हणजे यावेळी पेट्रोल आधी सीएनजीचे दर वाढले आहेत. कच्चे तेल आणि मौल्यवान धातूंच्या किमतीत वाढ झाल्यानंतर आता सीएनजीच्या किमतीत वाढ झाली 

दिल्ली-एनसीआर (दिल्ली-एनसीआर सीएनजी किंमत) सीएनजीच्या दरात 1 रुपयांपर्यंत वाढ करण्यात आली आहे. आज सकाळी 6 वजाल्यापासून नवे दर लागू झाले आहेत.  दिल्लीत सीएनजीसाठी 57.51 रूपये मोजावे लागत आहेत. 

मुंबईत देखील सीएनजीचे दर वाढले आहेत. मुंबत एक लिटर पेट्रोलसाठी 66 रूपये मोजावे लागत आहेत, तर नवी मुंबईत 1 लिटर पेट्रोलसाठी 63.50 रुपये मोजावे लागत आहेत. 

ठाणे आणि पुण्यात क्रमशः 63.50 रुपये आणि 66 रुपये एक लिटरसाठी मोजावे लागत आहेत. एवढंच नाही तर पेट्रोलचे दर 10 ते 16 रुपयांनी तर डिझेलचे दर 8 ते 12 रुपयांनी वाढण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. किमतीतील ही वाढ वेगवेगळ्या टप्प्यात लागू होईल.