आता फक्त 'या' वेळेतच दिसणार कंडोमच्या जाहीराती...

अॅडव्हरटायजिंग स्टंडर्स काऊंसलिंग ऑफ इंडिया (ASCI)ने जाहीरातींबद्दल मोठा निर्णय घेतला आहे.

Darshana Pawar Darshana Pawar | Updated: Dec 8, 2017, 09:31 AM IST
आता फक्त 'या' वेळेतच दिसणार कंडोमच्या जाहीराती... title=

नवी दिल्ली : अॅडव्हरटायजिंग स्टंडर्स काऊंसलिंग ऑफ इंडिया (ASCI)ने जाहीरातींबद्दल मोठा निर्णय घेतला आहे. त्यानुसार कंडोमच्या जाहीराती या आता दिवसा दिसणार नाहीत. त्या फक्त रात्रीच्या वेळात प्रसारित केल्या जातील. 

बॉलीवुड अभिनेत्री सनी लियोनी हीच्या कंडोमच्या जाहीरातींवरून तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला. यासंदर्भात महाराष्ट्र राज्य महिला आयोगाने ASCI ला तक्रारीची दखल घेण्यास भाग पाडले. 

सलमानने केला विरोध 

त्याचबरोबर सलमानने 'बिग बॉस' मध्ये कंडोमच्या जाहीराती दाखवण्यास विरोध दर्शवला होता. या शो सर्व वयोगटातील लोक पाहत असल्याने कंडोमची जाहीरातीला सलमानने विरोध केला.

वेळेची मर्यादा

मीडिया रिपोर्टनुसार, आता कंडोमच्या जाहीराती रात्री १० नंतर आणि सकाळी ६ वाजेपर्यंत दाखवण्यात येतील. 

आवाज उठवला

यापुर्वी देखील कंडोमच्या जाहीरातींना विरोध करण्यात आला होता. युवा संघटनांनी यावर आवाज उठवला होता. बऱ्याच विरोधानंतर ASCI  केंद्रीय सूचना आणि प्रसारण मंत्रालय सांगितले की, कंडोमच्या जाहीराती रात्री १० नंतर आणि सकाळी ६ वाजेपर्यंत दाखवण्याचे मंत्रालयाने सर्व टी.व्ही. चॅनल्सला आदेश द्यावेत.