Commercial LPG Rate : ऑक्टोबरच्या पहिल्याच दिवशी महागाईचा फटका, 209 रुपयाने वाढला सिलेंडर

Commercial Gas Cylinder : कमर्शिअल एलपीजी सिलेंडरच्या दरात वाढ झाली आहे. सिलेंडरच्या किंमतीत तब्बल 209 रुपयांनी वाढ झाली आहे. सिलेंडरचे नवे दर जाणून घेऊया. 

दक्षता ठसाळे-घोसाळकर | Updated: Oct 1, 2023, 09:01 AM IST
Commercial LPG Rate : ऑक्टोबरच्या पहिल्याच दिवशी महागाईचा फटका, 209 रुपयाने वाढला सिलेंडर

Commercial LPG Cylinders Rates : ऑक्टोबरच्या पहिल्याच दिवशी महागाईचा झटका लागला आहे. कमर्शिअल एलपीजी गॅस सिलेंडरच्या दरात 209 रुपयांनी वाढ झाली आहे. कमर्शिअल एलपीजी गॅस सिलेंडरची किंमत वाढून आता 1731.50 रुपये झाली आहे. ऑइल मार्केटिंग कंपन्यांनी रविवारी कमर्शिअल एलपीजी सिलेंडरची किंमत 209 रुपयांनी वाढवली आहे. या किंमती आजपासून लागू केले जाणार आहे. 

Add Zee News as a Preferred Source

किती झाली सिलेंडरची किंमत?

हा निर्णय ओएमसीकडून 1 सप्टेंबर ते कमर्शिअल एलपीजी सिलेंडरची किंमत 158 रुपयांची कपात केल्यानंतर एक महिन्यांनी हा निर्णय घेतला आहे. कमर्शिअल सिलेंडरची किंमत 1522 रुपयांवरून वाढून 1731.50 रुपये झाला आहे. केंद्र सरकारने ऑगस्टमध्ये देशभरातील सर्व  कनेक्शनधारकांसाठी घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किमती 200 रुपयांनी कमी केल्याच्या अवघ्या एका महिन्यानंतर व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या किमतीत नवीनतम वाढ झाली आहे.

घरगुती सिलेंडरचे किती झाले दर 

व्यावसायिक आणि घरगुती दोन्ही एलपीजी सिलिंडरची किंमत दर महिन्याच्या पहिल्या दिवशी सुधारित केली जाते. याआधी ऑगस्टमध्येही ऑइल मार्केटिंग कंपनीने व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या किमती 99.75 रुपयांनी कमी केल्या होत्या. त्याचबरोबर जयपूरमध्येही व्यावसायिक सिलिंडर महाग झाले आहेत. मात्र, घरगुती एलपीजी सिलिंडरच्या दरात कोणतीही वाढ झालेली नाही. त्याचबरोबर व्यावसायिक एलपीजी सिलिंडर २०२ रुपयांनी महागला आहे. आता 1552 रुपयांऐवजी 1754 रुपयांना मिळणार आहे. तथापि, घरगुती एलपीजी सिलिंडरची किंमत 906 रुपये राहील. नवीन दर आजपासून लागू झाले आहेत.

या आधी किंमत कधी बदलली?

यापूर्वी 30 ऑगस्ट रोजी केंद्र सरकारने जनतेला महागाईपासून दिलासा दिला होता. यासाठी घरांमध्ये वापरल्या जाणाऱ्या एलपीजी गॅस सिलिंडरची किंमत २०० रुपयांनी कमी करण्यात आली आहे. या निर्णयानंतर दिल्लीत 14.2 किलो एलपीजी सिलिंडरची किंमत 903 रुपये झाली, जी आधी 1,103 रुपये होती. मुंबईत व्यावसायिक वापराचा सिलेंडर 1684 रुपयांनी वाढला. 

About the Author

Dakshata Thasale

दक्षता ठसाळे-घोसाळकर या 'झी 24 तास डिजिटल'मध्ये चीफ सब एडिटर म्हणून कार्यरत आहे. यांना पत्रकारिता या क्षेत्रातील 14 वर्षांचा अनुभव आहे. 'प्रहार' आणि 'लोकमत' या आघाडीच्या वृत्तसंस्था आणि 'टीव्ही 9' आणि 'न्यूज एक्सप्रेस मराठी' या आघाडीच्या वृत्तवाहिनीचा अनुभव घेतल्यानंतर डिजीटल क्षेत्रात काम करण्यास सुरुवात केली. 'India.com मराठी' या डिजीटल वेबसाईटमध्ये काम केल्यानंतर 'महाराष्ट्र टाईम्स' च्या ऑनलाईन वेबसाईटसाठी काम केलं. यानंतर 'झी 24 तास डिजीटल'मध्ये विविध विषयांवरील बातम्यांमध्ये योगदान दिलं आहे. यामध्ये Lifestyle, आरोग्य, मनोरंजन यामधील बातम्यांमध्ये हातखंडा असून राज्यस्तरीय घडामोडी, गुन्हे आणि राजकीय घडामोडींमध्ये सर्वात मोठं योगदान आहे. पालकत्व, गर्भधारणा आणि पाककृती यासंदर्भात लेख लिहण्यास विशेष रुची आहे. 

...Read More