फुटीरतावाद्यांच उद्या काश्मीर बंदचं आवाहनं

 या बंदच्या पार्श्वभूमीवर अमरनाथ यात्रा २ दिवसांसाठी रद्द करण्यात आलीय.

Updated: Aug 5, 2018, 04:34 PM IST
फुटीरतावाद्यांच उद्या काश्मीर बंदचं आवाहनं  title=

काश्मीर : फुटीरतावाद्यांनी आज आणि उद्या काश्मीर बंदचं आवाहन केलंय. 'अनुच्छेद ३५-ए'ला समर्थन देण्यासाठी फुटीरतावाद्यांनी या बंदची हाक दिलीय. या अनुच्छेद ३५-ए मुळे काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा प्राप्त झालाय. फुटीरतावादी नेता सय्यद अली गिलानी, मीरवाईज उमर फारुख आणि यासिन मलिक यांनी ही बंदची हाक दिलीय. अनुच्छेद-३५ ए हटवल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा काही संघटनांनी दिलाय. या बंदच्या पार्श्वभूमीवर अमरनाथ यात्रा २ दिवसांसाठी रद्द करण्यात आलीय.

पाच दहशतवाद्यांना कंठस्नान

काश्मीरच्या शोपियान सेक्टरमध्ये शनिवारी झालेल्या चकमकीत भारतीय जवानांनी पाच दहशतवाद्यांना कंठस्नान घातले. येथील किलोरा गावात काल (शुक्रवारी) रात्रीपासून ही चकमक सुरु होती. काहीवेळापूर्वीच ही चकमक थांबली असून पाचही दहशतवाद्यांचे मृतदेह लष्कराच्या हाती लागले आहेत. हे सर्वजण लष्कर-ए-तोयबा संघटनेचे होते. काश्मीरमध्ये गेल्या तीन दिवसांपासून लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये सातत्याने चकमक सुरु आहे. मागील ७२ तासांमध्ये ९ अतिरेक्यांना कंठस्नान घालण्यात सुरक्षा दलांना यश आले आहे.