सोनिया गांधी रुग्णालयात दाखल

सोनिया गांधी यांची तब्बेत स्थिर असल्याचे रुग्णलयातून सांगण्यात आले.

Updated: Jul 30, 2020, 08:49 PM IST
सोनिया गांधी रुग्णालयात दाखल  title=

नवी दिल्ली : कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी रुग्णालयात दाखल झाल्या आहेत. संध्याकाळी ७ वाजता त्या नवी दिल्लीतील गंगाराम रुग्णालयात दाखल झाल्या. नेहमीच्या आरोग्य तपासणीसाठी त्या रुग्णालयात आल्या.

त्यांची तब्बेत स्थिर असल्याचे रुग्णलयातून सांगण्यात आले.