Rahul Gandhi Corona Positive : काँग्रेस नेते राहुल गांधींना कोरोनाची लागण, ट्विट करून दिली माहिती

कोरोनाची लागण झाल्यानंतर स्वतः दिली माहिती 

Updated: Apr 20, 2021, 03:34 PM IST
Rahul Gandhi Corona Positive : काँग्रेस नेते राहुल गांधींना कोरोनाची लागण, ट्विट करून दिली माहिती

मुंबई : काँग्रेस नेता राहुल गांधी यांना कोरोनाची लागण झाली आहे. राहुल गांधी यांनी स्वतः ट्विट करून ही माहिती दिली आहे. कोविडची लक्षणे आढळल्यानंतर त्यांनी टेस्ट केली. जो पॉझिटिव्ह आला आहे. (Rahul Gandhi Corona Positive ) काँग्रेस नेते राहुल गांधींना कोरोनाची लागण झाली असून स्वतः ट्विट करून माहिती दिली आहे. 

कोरोनाची सौम्य लक्षणे आढळल्यामुळे चाचणी केल्याची माहिती राहुल गांधी यांनी दिली आहे. त्याचप्रमाणे येत्या काही दिवसात माझ्या संपर्कात आलेल्यांनी प्रत्येकाने काळजी घ्यावी, असं देखील त्यांनी म्हटलं आहे.