बंगळुरू : काँग्रेसचे आमदार प्रतापगौडा पाटील हे बहुमत चाचणीला एक तास बाकी असताना परतले आहेत, प्रतापगौडा पाटील हे फुटून भाजपाकडे गेले असल्याचं म्हटलं जात होतं, पण ते जेव्हा परतले तेव्हा त्यांनी येडियुरप्पा यांच्याकडे जाणं टाळलं, यानंतर जेडीएसच्या आणखी जीवात जीव आला आहे, तर भाजपाच्या गोटात आणखी चेहरे पडले आहेत. तर दुसरीकडे आता भाजपाला बहुमतासाठी १११ आमदारांची गरज होती ती वाढली आहे, भाजपाने यापूर्वीच आपल्याकडे ११२ आमदार असल्याचा दावा केला होता. यापूर्वी येडियुरप्पा यांनी पक्षश्रेष्ठींना आपण बहुमत चाचणीपूर्वी राजीनामा देणार असल्याचा निरोप पाठवला आहे. कर्नाटकाच्या राजकारणात भाजपाला अनेक धक्के बसत आहेत.
काँग्रेसचा एक आमदार परतल्यानंतर, भाजपाची बहुमताची शक्यता आणखी धुसर झाली आहे. सर्वोच्च न्यायालयाने येडियुरप्पा यांना आज ४ पर्यंत बहुमत सिद्ध करण्याचे आदेश दिले होते, त्यानुसार ही प्रक्रिया सुरू आहे.
कर्नाटक विधानसभेतील भाजपाचे मुख्यमंत्री येडियुरप्पा सरकारच्या बहुमत चाचणीकडे साऱ्या देशाचं लक्ष लागून आहे. भाजपाने बहुमत मिळवण्यासाठी आटापिटा केला आहे, तर दुसरीकडे काँग्रेस आणि जेडीएसने मिळून भाजपाला सरकारबाहेर ठेवण्यासाठी बहुमत ठराव पाडण्यासाठी मजबूत तटबंदी उभारली आहे. भाजपाला ही तटबंदी भेदण्यात यश येताना दिसत नसल्याने भाजपाच्या गोटात मोठी नाराजी आहे, आता येडियुरप्पा सरकारला एकच गोष्ट वाचवू शकते, ते म्हणजे येडियुरप्पा यांचं भावनिक आवाहन. यासाठी येडियुरप्पा यांनी १३ पानी भाषणाची तयारी केली असल्याचं सांगण्यात येत आहे. मात्र त्यापूर्वी कर्नाटक विधानसभेतील बहुमत चाचणीपूर्वी, खालील महत्वाच्या ५ घडामोडी जाणून घेणे महत्वाचे आहे.
१)बहुमत जमवता येईल असं वाटत नसल्याने, येडियुरप्पा हे बहुमत चाचणीपूर्वीच राजीनामा देऊ शकतात, राजीनाम्याचा केंद्रीय नेतृत्वाकडे येडियुरप्पा यांचा निरोप
२) बहुमत चाचणी होण्यापूर्वी येडियुरप्पा भाषण करतील आणि आपला राजीनामा सोपवतील असं म्हटलं जात आहे. यासाठी येडियुरप्पा यांनी १३ पानी भाषण तयार केल्याचं सांगितलं जात आहे.
३) दुसरीकडे काँग्रेसचे ते 1 आमदार अजूनही गायब आहे. यापैकी प्रतापगौडा पाटील परतले आहेत, पण त्यांनी येडियुरप्पा यांच्याकडे जाणे टाळले, यामुळे अजूनही विरोधीपक्ष आपली तटबंदी सांभाळून आहे. भाजपाला बहुमत सिद्ध करण्यासाठी ६ आमदारांची अजूनही गरज आहे. दुसरीकडे काँग्रेस-जेडीएसमधील काही आमदार येडियुरप्पा यांना मतदान करू शकतात, अशीही शक्यता व्यक्त केली जात आहे.
४) कर्नाटक विधानसभेत सकाळपासून आतापर्यंत २०० आमदारांचा शपथविधी पूर्ण झाला आहे, आणि दुसरीकडे कोर्टाने दिलेल्या मुदतीची दुपारी ४ ची वेळ जवळ येत आहे.
५) येडियुरप्पा यांनी काँग्रेस आमदाराला मंत्रीपद आणि १५ कोटी रूपयांची ऑफर दिल्याची ऑडीओ क्लीप असल्याचा दावा काँग्रेसने केला आहे.