तेलंगणामध्ये काँग्रेसच्या पोस्टरमुळे राजकीय वातावरण तापलं

तेलंगणामध्ये काँग्रेसचं पोस्टर वादात

Updated: Jan 24, 2019, 11:04 AM IST
तेलंगणामध्ये काँग्रेसच्या पोस्टरमुळे राजकीय वातावरण तापलं title=

हैदराबाद : तेलंगाणामध्ये दुसऱ्यांदा के चंद्रशेखर राव यांनी सत्ता मिळवली आहे. वेळेच्या आधी निवडणूक झाल्याने याचा त्यांना फायदा झाला. टीआरएसच्या विरोधात काँग्रेस आणि टीडीपी यांनी आघाडी केली होती. पण तेलंगणामध्ये जनतेने पुन्हा एकदा के चंद्रशेखर यांच्या बाजूने कौल दिला. विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या पराभवानंतर दोन्ही पक्षाने आरोपांचा पाढा वाचायला सुरुवात केली आहे. चंद्रशेखर राव यांचा विजय हा लोकशाहीचं वस्त्रहरण असल्याचं काँग्रेसने म्हटलं आहे. यावेळी काँग्रेसने निवडणूक आयोगावर ही टीका केली आहे. सध्या एका पोस्टरमुळे तेलंगणामध्ये वातावरण तापलं आहे. तेलंगणा भाजपने यावर काँग्रेसने हिंदू महिलांचा अपमान केल्याचा आरोप केला आहे.

तेलंगणामध्ये निवडणुकीच्या निकालाविरोधात काँग्रेसने लढाई सुरु केली आहे. या संबंधित काँग्रेसने एक पोस्टर छापलं आहे. जे सध्या चांगलंच वादात सापडलं आहे. या पोस्टरमध्ये एका महिलेचं वस्त्रहरण करताना दाखवलं आहे. हा हिंदू महिलांचा अपमान असल्याचा आरोप भाजपने केला आहे. यासाठी राहुल गांधी यांनी माफी मागावी अशी देखील मागणी भाजपने केली आहे.

हे पोस्टर वादात येण्याचं कारण म्हणजे, या पोस्टरमध्ये ज्या प्रकारे महाभारतात द्रवपदीचं वस्त्रहरण झालं होतं तसंच चित्र दाखवण्यात आलं आहे. या पोस्टरमध्ये निवडणूक आयोगावर ही टीका केल्य़ाने हे पोस्टर वादाचं कारण बनलं आहे.