नवी दिल्ली : काँग्रेसचे (Congress) ज्येष्ठ नेते अहमद पटेल (Ahamad Patel) यांचं निधन झालं आहे. पहाटे साडे तीन वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते ७१ वर्षांचे होते. त्यांच्यावर दिल्लीतल्या रूग्णालयात उपचार सुरू होते. महिनाभरापासून अहमद पटेल यांची कोरोनाशी (COVID19) झुंज सूरू होती. मात्र त्यांच्याकडून उपचारांना म्हणावा तसा प्रतिसाद मिळत नव्हता.
सोनिया गांधी यांचे राजकीय सल्लागार म्हणून काम पाहिलेले अहमद पटेल, सोनिया गांधींचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जायचे. काँग्रेस पक्षाच्या कोषाध्यक्षाची जबाबदारी त्यांच्यावर होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेसचे नेते राहुल गांधी, प्रियंका गांधी यांनी ट्विट करून अहमद पटेलांना श्रद्धांजली वाहिलीय.