पाहा, शशी थरुर कोणाला म्हणतायेत 'एक अजनबी, हसीना से... '

गाणं गातानाचा व्हिडीओ प्रचंड व्हायरल... 

Updated: Sep 6, 2021, 07:42 PM IST
पाहा, शशी थरुर कोणाला म्हणतायेत 'एक अजनबी, हसीना से... '
व्हिडीओ स्क्रीनग्रॅब

मुंबई : राजकीय वर्तुळापलीकडेही आपल्या इंग्रजीवरील प्रभुत्वामुळं चर्चेत असणाऱ्या आणि इंग्रजीतील शब्दसंपदेनं भल्याभल्यांना थक्क करणाऱ्या शशी थरुर यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

खुद्द थरुर यांनीच ट्विटरवर हा व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामध्ये ते 'एक अजनबी हसीना से यूँ मुलाकात हो गई..' हे गाणं म्हणताना दिसत आहेत. कायमच वक्ते म्हणून एखाद्या व्याख्यानामध्ये समोर असणाऱ्या श्रोत्यांना जागतिक राजकारण, घडामोडी किंवा मग इंग्रजीचे धडे देणाऱ्या थरुर यांचा हा फिल्मी अंदाज सर्वांसाठीच नवा असला तरीही तो तितकाच गुंतवून ठेवणारा ठरत आहे. 

शशी थरुर (shashi tharoor) यांनी हे गाणं दूरदर्शन श्रीनगर यांच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमामध्ये गायलं. एका संसदीय समितीसाठी त्यांनी हा परफॉर्मन्स दिला. हाच व्हिडीओ ट्विट करत कोणताही सराव न करता लोकांच्या आग्रहास्तव आपण हे गाणं गायल्याचं थरुर म्हणाले. मोबाईलमध्ये गाण्याचे बोल पाहून त्यांनी गाणं गात सर्वांनाच थक्क केलं. 

किशोर कुमार यांचं गाजलेलं गीत... 
'एक अजनबी हसीना से यूँ मुलाकात हो गई..' हे गाणं 1974 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'अजनबी' या चित्रपटातील आहे. लोकप्रिय गायक किशोर कुमार यांनी या गाण्याला स्वरबद्ध केलं असून, आरयडी. बर्मन यांनी गाण्याला संगीत दिलं आहे. आनंद बक्षी यांनी हे गीत लिहिलं आहे.