Sukesh Chandrashekhar कैद्यांसाठी दिले 5.11 कोटी! पोलिसांना म्हणाला, "मला बर्थडे गिफ्ट द्यायचं असेल तर..."

Sukesh Chandrashekhar Help To Tihar Inmates: सुकेश चंद्रशेखर हा मागील बऱ्याच काळापासून दिल्लीमधील तिहार तुरुंगामध्ये कैद आहे. त्याने येथील जेल निर्देशकांना पत्र लिहून कैद्यांना मदत करण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

Updated: Mar 22, 2023, 07:02 PM IST
Sukesh Chandrashekhar कैद्यांसाठी दिले 5.11 कोटी! पोलिसांना म्हणाला, "मला बर्थडे गिफ्ट द्यायचं असेल तर..." title=
sukesh chandrasekhar

Conman Sukesh Chandrashekhar want to help Inmates: दिल्लीमधील तिहार तुरुंगामध्ये 200 कोटींच्या घोटाळा प्रकरणामध्ये अटकेत असलेल्या सुकेश चंद्रशेखरने आता अन्य कैद्यांना मदत करण्याचा निर्णय घेतला आहे. या तुरुंगामध्ये असलेल्या कैद्यांना जामीन मिळवून देण्यासाठी आर्थिक मदत करण्याची इच्चा व्यक्त करताना सुकेशने तुरुंग निर्देशकांकडे यासंदर्भातील विचारणा केली आहे. सुकेशने पत्र लिहून, गरीबी आणि आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने जामीनासाठी पैसा नसेल्यांना तसेच जे घरातील प्रमुख व्यक्ती असूनही पैशांच्या कमतरतेमुळे जामीन न मिळाल्याने तुरुंगात अडकून पडेल अशा कैद्यांची मदत करण्याची माझी इच्छा आहे असं म्हटलं आहे. आपण 5 कोटी 11 लाखांचा डिमांड ड्राफ देऊन या कैद्यांची मदत करु इच्छितो असं सुकेशने पत्रात म्हटलं आहे.

25 मार्चलाच स्वीकारा 5.11 कोटी कारण...

"एक माणूस म्हणून मी याच लोकांसारख्या परिस्थिती अडकलो आहे जिथे मला माझ्या प्रिय व्यक्तींपासून दूर रहावं लागत आहे. मी चांगल्या विचाराने तुम्हाला नम्रपणे विनंती करतो आहे की, मी दिलेला 5.11 कोटींचा डिमांड ड्राफ कैद्यांच्या वेलफेअरसाठी स्वीकारावा. माझ्या वाढदिवसाच्या दिवशी म्हणजेच 25 मार्च रोजी हा डिमांड ड्राफ स्वीकारल्यास मला फार आनंद होईल. हे माझ्यासाठी सर्वोत्तम गिफ्ट असेल," असं सुकेशने पत्रात म्हटल्याचं वृत्त एएनआय या वृत्तसंस्थेनं दिलं आहे. सुकेशने अनेक कुटुंबांनी त्यांच्या कुटुंबातील सर्वात महत्त्वाची व्यक्ती अनेक वर्ष तुरुंगात अडकून राहिल्याने आत्महत्या केल्याचंही म्हटलं आहे. अशा आत्महत्या रोखण्यासाठी माझ्याबाजूने थोडी मदत म्हणून मी हे पैसे देऊ इच्छितो असं सुकेशनं म्हटलं आहे.

सिसोदियांना व्हीव्हीआयपी ट्रीटमेंट

यापूर्वी सुकेश चंद्रशेखरने दिल्लीच्या नायाब राज्यपालांना पत्र लिहून तुरुंगामध्ये आपचे नेते मनीष सिसोदिया यांना व्हीव्हीआयपी ट्रीटमेंट दिली जात असल्याचं सांगितलं होतं. सुकेश चंद्रशेखने सिसोदिया यांना तुरुंगात मिळत असलेल्या व्हीव्हीआयपी ट्रिटमेंटची चौकशी करण्याची मागणी केली आहे. तसेच मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे मनीष सिसोदियांबद्दल खोटी माहिती पसरवत असल्याचा दावाही सुकेशने केला होता. सिसोदिया यांना जेल नंबर 1 च्या 9 नंबरच्या वॉर्डमध्ये ठेवण्यात आलं आहे. हे वॉर्ड तिहारमधील सर्वात मोठं व्हीव्हीआयपी वॉर्ड असल्याचा दावा सुकेशने केला आहे.

रडतानाचा व्हिडीओ

काही काळापूर्वीची दिल्लीमधील मंडोली तुरुंगात असतानाच सुकेश चंद्रशेखरचा एक व्हिडीओ समोर आला होता. यामध्ये सुकेश मोठमोठ्याने रडत होता. पहिल्यांदा हा व्हिडीओ पाहून रडणारी व्यक्ती ही सुकेशच असल्याबद्दल शंका वाटू लागते. हीच व्यक्ती बॉलिवूड अभिनेत्रींना कोट्यावधी रुपयांच्या भेटवस्तू द्यायची का असा प्रश्न पडावा इतक्या निरागसपणे सुकेश या व्हिडीओत रडताना दिसला होता.