Corona Alert : देशावर पुन्हा लॉकडाऊनचं संकट, पुन्हा होणार मास्कसक्ती?

देशात मास्कसक्ती पुन्हा लागू होण्याची शक्यता आहे. कोरोना अजून संपलेला नाही, असं सांगत केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं महत्त्वाच्या सूचना केल्यायत. 

Updated: Dec 21, 2022, 09:51 PM IST
Corona Alert : देशावर पुन्हा लॉकडाऊनचं संकट, पुन्हा होणार मास्कसक्ती? title=

Corona Alert : कोरोना (Corona) परतलाय.... आणि तो इतक्या घातक रुपात परतलाय की सरकार अॅक्शन मोडवर आलंय. त्याच्याशी मुकाबला कसा करायचा त्यावर केंद्रीय आरोग्य मंत्र्यांची बैठक झाली. या बैठकीत उपस्थित असलेल्या प्रत्येकाने मास्क (Mask Use) घातला होता. भविष्यात काय वाढून ठेवलंय, याचा अंदाज यावरून लावता येईल. देशात मास्कसक्ती पुन्हा लागू होण्याची शक्यता आहे. कोरोना अजून संपलेला नाही, असं सांगत केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं महत्त्वाच्या सूचना केल्यायत. 

  • गर्दीच्या ठिकाणी मास्क लावा 
  • ज्येष्ठ नागरिकांनी बूस्टर डोस घ्या
  • आजार असलेल्या लोकांनीही बूस्टर डोस घ्या
  • शाळा, कॉलेजेस, विद्यापीठं अलर्टवर
  • अधिका-यांना सतर्कतेचे आदेश
  • न्युमोनियाच्या रुग्णांची योग्य तपासणी करा
  • लक्षण असल्यास कोरोना टेस्ट करा

वाढत्या कोरोनामुळे राज्य सरकारही अलर्ट मोडवर आलंय. सगळी हॉस्पिटल्स, लॅबना अलर्ट राहण्याच्या सूचना देण्यात आल्यायत. 

भारतामध्ये कोरोनाविरोधात लोकांमध्ये मोठ्या प्रमाणात हर्ड इम्युनिटी निर्माण झाली आहे. तसंच लसीकरणही चांगल्या प्रमाणात झालंय. पण तरीही कोरोना अजून गेलेला नाही. तो कुठल्याही क्षणी त्याचं आक्राळ-विक्राळ रुप दाखवायला सज्ज झालाय. त्यामुळे ख्रिसमस, न्यू इअर पार्ट्यांना आणि गर्दीच्या ठिकाणी जाताना खबरदारी घ्या. कपाटात ठेवलेले मास्क पुन्हा एकदा बाहेर काढा आणि वापरायला सुरुवात करा.

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x