कोरोना संकट । आर्थिक धोरणावर राहुल गांधी - रघुराम राजन यांच्यात संवाद

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी भारतीय रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांच्याशी चर्चा केली.  

Updated: Apr 30, 2020, 11:52 AM IST
कोरोना संकट । आर्थिक धोरणावर राहुल गांधी - रघुराम राजन यांच्यात संवाद title=

नवी दिल्ली : देशावर कोरोनाचे संकट आहे. त्यातच अर्थव्यवस्था ठप्प आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेला चालना देण्याची मोठी गरज आहे. मोदी सरकारला काँग्रेसने काही उपाय योजना करण्यासाठी सल्लाही दिला आहे. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांनी केंद्र सरकारला सूचना केल्या आहेत. कोरोनातून अर्थव्यवस्था कशी सावरायची यावर काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी भारतीय रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांच्याशी चर्चा केली. राहुल गांधी देश-विदेशातील दिग्गज अर्थतज्ज्ञांशी चर्चा करणार आहेत. पहिली सुरुवात ही रघुराम राजन यांच्यापासून त्यांनी केली आहे.

भारताला किमान ६५,००० कोटींची गरज - राजन

कोरोना रोखण्यासाठी भारताला किमान ६५,००० कोटींची गरज आहे.आता लाॅकडाऊन उठवण्याबाबत ठोस निर्णय घेऊन दैनंदीन जीवन सुरळीत करण्याला सरकारने प्राधान्य द्यायला हवे. देशाची अर्थव्यवस्था २०० लाख कोटींची आहे. त्यापैकी ६५००० कोटी हे गरिबांच्या अन्नपुरवठ्यासाठी वापरायला हवेत. करोनाने साऱ्या जगासमोर आव्हान उभे केले आहे. करोना रोखण्यासाठी नियमांपलिकडे जाऊन काम करावे लागेल, असे रघुराम राजन यांनी यावेळी सांगितले.

कोरोनाचा सामना करण्याबरोबर आर्थिक घडी सुधरण्यासाठी सरकारला प्राधान्यक्रम ठरवावा लागेल. अर्थव्यवस्थेला पुन्हा गती देण्यासाठी व्यापक विचार करावा लागेल. लाॅकडाऊनमुळे अर्थव्यवस्था पूर्णपणे ठप्प आहे. त्यामुळे त्याला चालना देण्यासाठी नियोजन करण्याची गरज आहे. तशी योजना आखण्याची गरज असल्याचे राजन यांनी सांगितले.

दरम्यान, राहुल गांधी कोरोना महामारीच्या संकटानंतर येणाऱ्या आर्थिक संकटाबाबत अभ्यास करत आहेत. ते  राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांकडून चर्चा करत आहेत. कोरोनाचे संकट असताना राहुल गांधी सतत कार्यरत असतात. अलिकडेच त्यांनी मोदी सरकारच्या लॉकडाऊनच्या नंतरच्या प्लानवर चर्चा केली. राहुल कोरोनाची टेस्टिंग आणि अर्थव्यवस्थेविषयी सूचना सुचविण्याच्या प्रकरणात सक्रिय आहेत. त्यासाठी ते चर्चा करत आहेत, अशी माहिती काँग्रेसकडून देण्यात आली.

कोरोनाच्या संकटात काँग्रेस केंद्र सरकारबरोबर आहे. मात्र, चुकीची धोरणावर सातत्याने काँग्रेसकडून केंद्रावर निशाणा साधला आहे. लॉकडाऊन घोषीत करण्यापूर्वी काहीही नियोजन केले नाही. त्यामुळे गरिबांवर उपाशी राहण्याची वेळ आली आहे. त्यांचे हाल होत आहेत, अशी टीका काँग्रेसकडून करण्यात आली आहे. कोणताही निर्णय घेताना विचार केला पाहिजे. विचार न करता कोणताही निर्णय किंवा योजना आमलात आणली तर त्याचे मोठे नुकसान होते, असा सल्लाही केंद्र सरकारला काँग्रेसने दिला आहे.

काँग्रेसने नोटबंदी प्रमाणे लॉकडाऊनचा निर्णय घेतल्याने टीका केली आहे. आज देशातील जनतेला आणि अर्थव्यवस्थेला नोटबंदीमुळे नुकसान होत आहे. १४ कोटी पेक्षाअधिक लोक आपली नोकरी, व्यवसाय गमावून बसले आहेत. तसेच कोरोनानंतर संकट आहे. अनेकांच्या नोकऱ्या जाऊ शकतात, असे काँग्रेसकडून भीत वर्तविण्यात आली आहे. त्यांच्यासाठी सरकारच्या योजना काय आहेत, असा सवालही उपस्थित केला आहे.