मुंबई : देशामध्ये Corona रुग्णांमध्ये दररोज निरंतर वाढ होत आहे. भारतात दररोज आता 3 लाखाहून अधिक प्रकरणे नोंदवली जात आहेत. आतापर्यंत जगात इतके प्रकरण एका दिवसात आले नव्हते. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी दररोज कोविडशी सामना करण्यासाठी काय काय करता येईल याबाबत बैठका घेत आहेत. दरम्यान, सोमवारी देशात कोविडची 3,52,991 नवीन प्रकरणे नोंदवली गेली. यासह देशात संक्रमितांची संख्या 28,13,658 इतकी झाली आहे.
आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, "महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, कर्नाटक, केरळ, राजस्थान, छत्तीसगड, गुजरात आणि तामिळनाडू या राज्यांमध्ये 1 लाखाहून अधिक सक्रिय रुग्ण आहेत." यासह आरोग्य मंत्रालयाने माहिती दिली की आतापर्यंत 14.19 कोटी लसींचा डोस देण्यात आला आहे.
आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल म्हणाले की, सध्या देशात 82% कोरोना रुग्ण बरे झाले आहेत. सुमारे 16.25% म्हणजेच 28,13,658 अजूनही अॅक्टीव्ह आहेत. ज्यावर लक्ष ठेवले जात आहे. ' ते पुढे म्हणाले की, अशी काही राज्ये आहेत जिथे सक्रिय प्रकरणांची संख्या जास्त आहे. ज्यामध्ये महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, कर्नाटक, केरळ, राजस्थान, छत्तीसगड, गुजरात आणि तामिळनाडू या राज्यांचा समावेश आहे. आतापर्यंत संपूर्ण देशात 14,19,00,000 जणांना लस देण्यात आली आहे.
त्याचवेळी गृह मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव म्हणाले की, 'भारत खरेदी व भाड्याने परदेशातून ऑक्सिजन टँकर घेत आहे. ऑक्सिजन टँकरची वाहतूक हे एक मोठे आव्हान आहे. रीअल-टाइम ट्रॅकिंगचा वापर करून, आम्ही ऑक्सिजन टँकरच्या हालचालींवर नजर ठेवत आहोत. '
एम्सचे संचालक रणदीप गुलेरिया म्हणाले, 'जो कोणी कोविड पॉझिटिव्ह येतो तो घाबरतो की कोठेतरी मला ऑक्सिजनची गरज लागेल. त्यामुळे मी आता दाखल होतो. यामुळे रुग्णालयांच्या बाहेर बरीच गर्दी होतेय आणि ज्यांना खरंच गरज आहे त्यांच्यावर उपचार करता येत नाहीत.'
गृह मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव म्हणाले की, 'वैद्यकीय ऑक्सिजनचे उत्पादन वाढले आहे. आमची ऑक्सिजन उत्पादन क्षमता 7,259 मेट्रिक टन आहे आणि 24 एप्रिल रोजी 9,103 मेट्रिक टन ऑक्सिजन तयार झाले आहे.'