कोरोनामुळे माजी मुख्यमंत्र्यांचं निधन, तर एनएसजीच्या माजी प्रमुखांचाही मृत्यू

 कोरोनाचा व्हायरस तरूणांना सर्वाधिक संसर्ग तरुणांमध्ये वाढत असल्याचं आता समोर येत आहे.

Updated: May 20, 2021, 02:07 PM IST
कोरोनामुळे माजी मुख्यमंत्र्यांचं निधन, तर एनएसजीच्या माजी प्रमुखांचाही मृत्यू title=

मुंबई : कोरोना संसर्गाच्या दुसर्‍या लाटेचा सामना करत असताना रोज वेगवेगळ्या चिंता वाढवणाऱ्या घटना समोर येत आहेत. कोरोनाचा व्हायरस तरूणांना सर्वाधिक संसर्ग करत असल्याचं आता समोर येत आहे. महाराष्ट्र आणि कर्नाटकमध्ये मृत्यूचे प्रमाण सर्वाधिक असून 11 राज्यांमधील तरुण या साथीच्या आजारापेक्षा जास्त असुरक्षित आहेत. दरम्यान, गेल्या 24 तासांत पुन्हा एकदा प्रकरणे वाढली आहेत. 

गेल्या 24 तासात 3.68 लाख लोकं बरे झाले आहेत. 18 मे रोजी हाच आकडा 3.89 लाख होता. यापूर्वी 17 मे रोजी 4.22 लाख लोकं कोरोनामुक्त झाले होते.

राजस्थानचे माजी मुख्यमंत्री जगन्नाथ पहाडिया यांचे कोरोनामुळे निधन झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या मृत्यूवर शोक व्यक्त केला आहे. मोदींनी ट्विट केले की, राजस्थानचे माजी मुख्यमंत्री जगन्नाथ पहाडियाजी यांच्या निधनामुळे मी दु:खी आहे. आपल्या दीर्घ राजकीय आणि प्रशासकीय कारकीर्दीत त्यांनी सामाजिक सबलीकरणामध्ये महत्त्वपूर्ण योगदान दिले.' 

राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनीही शोक व्यक्त करत म्हटलं की, 'पहाडिया यांनी राज्यपाल म्हणून, केंद्रीय मंत्री म्हणून प्रदीर्घ काळ देशाची सेवा केली. ते देशातील ज्येष्ठ नेत्यांपैकी एक होते.'

एनएसजीचे माजी प्रमुख ज्योती कृष्णा दत्त उर्फ ​​जेके दत्त यांचे बुधवारी गुरगावमध्ये कोरोनाने निधन झाले. मुंबई दहशतवादी हल्ल्यात आयपीएस अधिकारी दत्त यांनी 'ऑपरेशन ब्लॅक टोरनेडो' चे नेतृत्व केले. ऑगस्ट 2006 ते फेब्रुवारी 2009 पर्यंत ते एनएसजीचे डीजी होते. एनएसजीमध्ये येण्यापूर्वी ते सीबीआयचे विशेष संचालकही होते. त्यांची कार्यशैली खूप लोकप्रिय होती. 

तरुणांमध्ये कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने केंद्र सरकार देखील सावध झालं आहे. केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत असे निदर्शनास आले की, 11 राज्यांमधील तरुणांना संसर्ग होण्याची शक्यता जास्त आहे. एकट्या महाराष्ट्रात, जानेवारी ते 9 मे दरम्यान 30 वर्षाखालील 651 लोकांचा मृत्यू झाला आहे. गेल्या वर्षी मार्च ते डिसेंबर या काळात हीच संख्या 10 राज्यात 1117 होती. 17 मार्च ते 17 मे दरम्यान कर्नाटकात 2465 लोकांचा मृत्यू झाला. ज्यामध्ये 20 ते 49 वर्षे वयोगटातील 56 टक्के लोकांचा समावेश आहे.