CORONA: दोन लसीतला गॅप वाढवला ही चूक ; NTAGI च्या तज्ज्ञांचा दावा

दोन लसींमधील अंतर हे 6 ते 8 आठवडे होते.

Updated: Jun 16, 2021, 05:56 PM IST
CORONA: दोन लसीतला गॅप वाढवला ही चूक ; NTAGI च्या तज्ज्ञांचा दावा title=

मुंबई : ज्या लोकांनी सीरम इन्स्टिट्यूटच्या कोरोना लसीचा पहिला डोस घेतला आहे आणि जे लोकं दुसर्‍या डोसची प्रतीक्षा करत आहेत अशा लोकांना लसीसाठी आणखी थोडावेळ थांबावे लागेल. सरकारने दिलेल्या माहितीनूसार पॅनेल NTAGI ने सुचवले की, कोव्हिशिल्डची पहिली लस मिळाल्यानंतर दुसरी लस 12 ते 16 आठवड्यांत दिली जाऊ शकते. तर सुरवातीला दोन लसींमधील अंतर हे 6 ते 8 आठवडे होते. तर, भारत बायोटेकच्या लस कोव्हॅक्सिनच्या कालावधीत कोणताही बदल झाला नाही आणि पहिल्या डोसनंतर 4-6 आठवड्यांच्या दरम्यान दुसरा डोस लागू करणे आवश्यक आहे.

पीटीआयच्या वृत्तानुसार, लसीचा दुसरा डोस घेण्याचा कालावधी 12 ते 16 आठवड्यांचा करण्याच्या या निर्णयाल वैज्ञानिक गटाटच्या शिफारशींनुसार घेतल्याचं सांगितले होते. परंतु आता त्या वैज्ञानिकांनी यासंदर्भात एक धक्कादायक खुलासा केला आहे.

लसीच्या दोन डोसमधलं अंतर वाढवून दुप्पट करण्याच्या निर्णयाला आमचा पाठिंबा नव्हता, असा खुलासा या तज्ज्ञ गटातल्या ३ सदस्यांनी केला आहे. त्यामुळे आता केंद्र सरकारच्या या निर्णयावर मोठं प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे.

अंतर 12 आठवड्यांपेक्षा जास्त झालं तर…

NTAGIचे माजी संचालक एम. डी. गुप्ते यांच्या म्हणण्यानुसार, "NTAGI च्या वैज्ञानिकांनी 8 ते 12 आठवड्यांपर्यंत लसींमधील अंतर वाढवण्यावर सहमती दर्शवली होती. जागतिक आरोग्य संघटनेकडून देखील याबद्दलचा सल्ला देण्यात आला होता. परंतु 12 ते 16 आठवड्यानंतर लसीचा दुसरा डोस घ्यावा हा निर्णय केंद्र सरकारचा आहे. कोरोनाच्या दोन लसींमधील अंतर 12 आठवड्यांपेक्षा जास्त झाले तर 12 आठवड्यांनंतर कोणते संभाव्य परिणाम होऊ शकतील?  याचा कोणताही डाटा NTAGI कडे नाही." NTAGI चे सदस्य मॅथ्यु वर्गेसी यांनीही गुप्तेंच्या दाव्यावर सहमती दर्शवली आहे.