राहुल गांधींचा PM मोदींवर पुन्हा निशाना! देशात covid नाही movid पसरलाय

कोरोना संसर्ग योग्य पद्धतीने न हातळल्याने कॉंग्रेसनेते राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर टीका केली आहे

Updated: May 28, 2021, 07:59 PM IST
राहुल गांधींचा PM मोदींवर पुन्हा निशाना! देशात covid नाही movid पसरलाय title=

नवी दिल्ली : कोरोना संसर्ग योग्य पद्धतीने न हातळल्याने कॉंग्रेसनेते राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर टीका केली आहे. त्यांनी शुक्रवारी पत्रकार परिषद घेत कोरोना परिस्थिती हाताळण्यात मोदी सरकार पूर्णतः अपयशी ठरल्याची टीका केली आहे.

देशात Covid नाही Movid पसरला आहे

राहुल गांधीने म्हटले आहे की, आपल्या देशात कोविड नाही मोविड पसरला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक्शन घेतली असती तर, देशात फक्त कोविड असता परंतु पंतप्रधानांनी आपल्या एक्शनने देशात कोरोनाला जागा दिली आहे. त्यांनी उपचारासाठी व्यवस्था करण्याएवजी कधी थाळी वाजवून तर कधी पश्चिम बंगालमध्ये मोठ्या सभा करून देशात कोरोना पसरवला. यामुळे ते या महामारीला मोविड म्हणत आहेत.

पंतप्रधानांना कोरोना कळला नाही

सरकार आणि पंतप्रधान यांना आजपर्यंत कोरोना कळलेला नाही. कोरोना फक्त एक आजार नाही. तर कोरोना एक बदलता आजार आहे. तुम्ही त्याला जेवढा वेळ द्याल तेवढा तो खतरनाक होत जाईल. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेसाठी पंतप्रधान जबाबदार आहेत. पंतप्रधान नाटकी आहेत. त्यांनी आपली जबाबदारी पूर्ण केली नाही. त्यामुळे देशात दुसरी लाट आली. अशी टीका गांधी यांनी केली.

लसीकरणाचा वेग कमी

देशात मृत्यूचे जे दावे करण्यात येत आहेत ते खोटे आहेत. कोरोना मृतांचे आकडे कमी दाखवण्याऐवजी सरकारने लोकांच्या उपचाराकडे लक्ष द्यायला हवे. संसर्गामुळे लोकांचे प्राण जाणार नाहीत याकडे लक्ष द्यायला हवे