कसा पसरु शकतो तुमच्या रुममध्ये कोरोना?, आंतरराष्ट्रीय हेल्थ स्पेशलिस्टचा दावा

भारतात पसरत असलेला दुसर्‍या लाटेमधील हा विषाणू एअरबॅान आहे.

Updated: May 9, 2021, 03:59 PM IST
कसा पसरु शकतो तुमच्या रुममध्ये कोरोना?, आंतरराष्ट्रीय हेल्थ स्पेशलिस्टचा दावा

मुंबई : भारतात कोरोना विषाणूची लागण झालेल्या रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. दरम्यान, आंतरराष्ट्रीय आरोग्य तज्ञांनी असा इशारा दिला आहे की, भारतात पसरत असलेला दुसर्‍या लाटेमधील हा विषाणू एअरबॅान आहे. परंतु त्यांनी हे स्पष्ट केले की, हा विषाणू एअरबॅान जरी असला तरी याचा अर्थ असा नाही की, हा विषाणू श्वास घेताना हवेतून तुमच्या शरीरात जातो.

यूनाइटेड स्टेट्स सेंटर्स ऑफ डिझीज कंट्रोलने (CDC) शुक्रवारी कोरोना व्हायरस रोगाच्या प्रसार (कोविड -19) संबंधित एक नवीन सल्ला दिला आला आहे. कोरोना विषाणू मानवी शरीरात जाण्यासाठी तीन मार्गांचा वापर करतो.

CDCने असे सांगितले की, व्हायरस प्रामुख्याने श्वासोच्छवासाद्वारे, वाफ घेतल्याने आणि स्पर्श केल्याने होतो. परंतु नवीन रिसर्चनुसार असे आढळले आहे की, जर हवेमध्ये कोरोना विषाणूचे बारीक जीव असतील, तर ते आपण श्वास घेतल्यामुळे आपल्या शरीरात प्रवेश करू शकतात आणि आपल्याला संक्रमित करू शकतात.

या रिसर्चमध्ये असे सूचित केले गेले आहे की, कोणत्याही संक्रमित व्यक्तीच्या तीन ते सहा फूट जवळ राहिल्याने त्याचा सर्वात मोठा धोका आहे. कारण हे कोरोनाचे कण फारच लहान आहेत आणि श्वासोच्छ्ववासाच्या वेळी ते आपल्या शरीरात प्रवेश करतात ज्यामुळे समोरील व्यक्ती संक्रमित होऊ शकते. सल्लागार म्हणाले की, हा विषाणू श्वास घेणे, बोलणे, गाणे, व्यायाम करणे, खोकला, शिंका येणे आणि श्वासोच्छवासाद्वारे पसरतातो.

बंद खोलीत संसर्ग होण्याची शक्यता

एखाद्या व्यक्तीकडून दुसर्‍या व्यक्तीकडे रोगाचा प्रसार होण्याची शक्यता बंद खेलीत किंवा भागात जास्त असते. CDC ने हे देखील सांगितले आहे की, आपल्याला कोरोनाच्या मोठ्या विषाणुपासून जास्त धोका नाही कारण, ते काही सेकंदात हवेमध्ये संपतात, परंतु वजन कमी असणारे लहान कण हवेमध्येच तरंगतात.

मॅक्स हेल्थकेअरच्या डा रोमेल टिकू यांनी शुक्रवारी सांगितले की, "एअरबोर्नचा अर्थ असा नाही की, व्हायरस हवेमध्ये आहे आणि तो आपल्या श्वासोच्छवासाने आपणास संक्रमित करतो. एअरबोर्न म्हणजे एखाद्या लहान खोलीत कोविड -19 पॉझिटिव्ह व्यक्ती आहे आणि त्या खोलीत कोविड पॉझिटिव्ह व्यक्तीला खोकला आला तर ते विषाणू 30 मिनिट ते 1 तासापर्यंत हवेत जिवंत असू शकतो."