Covid In India : थंडी सुरु होताच देशात कोरोना रुग्ण वाढले, पुन्हा त्याच राज्याने चिंता वाढवली

Covid In kerala : देशात थंडीची चाहूल लागताच पुन्हा एकदा कोरोना रुग्णसंख्येत वाढ होऊ लागली आहे. देशात सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या एक हजार इतकी झाली आहे. काही दिवसांपूर्वी हीच संख्या पाचशे होते. वाढत्या रुग्णांमुळे पुन्हा एकदा चिंता वाढवली आहे. 

राजीव कासले | Updated: Dec 14, 2023, 03:47 PM IST
Covid In India : थंडी सुरु होताच देशात कोरोना रुग्ण वाढले, पुन्हा त्याच राज्याने चिंता वाढवली title=

Covid cases rising : जगभरात सध्या निमोनिया आजाराने थैमान घातलं आहे. याचदरम्यान कोरोना (Corona) व्हायरस पुन्हा एकदा सक्रिया झाला आहे. जगातील अनेक देशात कोरोना रुग्णांची संख्या (Covid19 Cases in India) वाढू लागली आहे. सिंगापूरमध्ये दररोज जवळपास तीन हजाराहून अधिक रुग्णांची नोंद होत आहे. रुग्णालयात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असून आयसीयूमध्ये भरती करण्यात येणाऱ्या रुग्णांच्या संख्येतही वाढ होत आहे. पण चिंतेची गोष्ट म्हणजे भारतातही गेल्या काही दिवसात कोरोनाची प्रकरणं समोर येत आहेत. देशात कोरोना सक्रिय रुग्णांची संख्या एक हजाराहून अधिक झाली आहे. दररोज या संख्येत वाढ होत आहे. गेल्या काही दिवासत सक्रिय रुग्णांची संख्या 500 इतकी होती. पण डिसेंबर महिन्यात थंडी (Winter) सुरु होताच कोरोनाचा आलेक वाढत चालला आहे.  

केंद्रीय आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार देशात सध्या कोरोनाच्या 1185 रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. गेल्या 24 तासात 237 नव्या प्रकरणांची नोंद करण्यात आली आहे. धक्कादायक म्हणजे कोरोनाचे सर्वात जास्त रुग्ण हे केरळ (Kerala) राज्यातील आहेत. केरळमध्ये गेल्या आठवड्यात केरळमध्ये कोरोनाचे 900 प्रकरणं नोंदवली गेली. देशातील एकूण कोरोना रुग्णांपैकी 90 टक्के रुग्ण हे एकट्या केरळ राज्यातील आहेत. दिलासादायक म्हणजे या रुग्णांमध्ये कोरोनाची सौम्य लक्षणं आढळली आहेत. 

कोरोनाचा पहिला रुग्ण केरळात
2020 मध्ये कोरोनाचा पहिला रुग्ण हा केरळातच आढळला होता. चीनहून भारतात आलेली केरळमधील वैद्यकीय विद्यार्थिनी देशातील पहिली कोरोना रुग्ण होती. चीनच्या वुहान युनिव्हर्सिटीत वैद्यकीय शिक्षण घेत असलेली ही विद्यार्थीनी जानेवारी, 2020 च्या शेवटच्या आठवड्यात भारतात परतली होती. 30 जानेवारी, 2020 रोजी तिला कोरोना झाल्याचं निदान झालं.

पुन्हा कोरोना का वाढतोय?
तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार जगातील अनेक देशात इन्फ्लूएंजा व्हायरस पसरला आहे. इन्फ्लूएंजा व्हायरसमुळे लोकांमध्ये सर्दी, खोकला आणि हलका ताप अशी लक्षण आढळत आहेत. अशी लोकं जेव्हा रुग्णालयात तपासणीसाठी जात आहेत, तेव्हा त्यांची कोविड तपासणीही केली जातेय. यातले काही रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळतायत. पण त्यांच्यात सौम्य लक्षणं आहेत. 

केरळात कोरोना रुग्ण जास्त सापडण्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे इतर राज्यांच्या तुलनेत केरळात वैद्यकीय आरोग्य व्यवस्था उत्तम आहे. केरळात फ्लू आणि इन्फ्लूएंजा सारख्या व्हायरसवर तात्काळ तपासणी  केली जात आहे. त्याचप्रमाणे सौम्य लक्षण आढळल्यावरही कोव्हिड तपासणी केली जात आहे. त्यामुळे इतर राज्यांच्या तुलनेत केरळात कोरोनाची जास्त प्रकरणं आहेत.