नवी दिल्ली : कोरोनाचा फैलाव सुरुच आहे. धक्कादायक बाबा म्हणजे आता राष्ट्रपती भवनातही कोरोनाचा शिरकाव झाला आहे. देशभारात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव दिसून येत आहे. गेल्या २४ तासांत १ हजार ५४० नवे रुग्ण आढळले तर ४० जणांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत १८ हजारांहून अधिक कोरोनाबाधित रुग्ण झाले आहेत. तर एकूण ५९२ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे चिंता व्यक्त करण्यात येत आहे.
BreakingNews। गेल्या २४ तासांत देशात कोरोनाचे १ हजार ५४० रुग्ण नव्याने आढळलेत तर ४० जणांचा मृत्यू । देशात एकूण १८ हजारांहून अधिक कोरोनाबाधित रुग्ण । एकूण ५९२ जणांचा कोरोनामुळे मृत्यू #CoronaVirus #Corona #IndiaFightsCorona #Covid19India @AnilDeshmukhNCP @ashish_jadhao
— ZEE २४ तास (@zee24taasnews) April 21, 2020
तर महाराष्ट्र राज्यात गेल्या २४ तासांत ४६६ नव्या रुग्णांची नोंद तर मुंबईत सर्वाधिक ३०८ नवे रुग्ण आढळले आहेत. महाराष्ट्र राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या ४ हजार ४६६वर गेली असून मृतांचा आकडा २३२ वर गेला आहे. दरम्यान, केंद्रीय आरोग्य पथक राज्यात दाखल झाले आहे. या पथकाने काल पुण्यातील आढावा घेतला आहे. हे पथक मुंबई, नागपूर आदी ठिकाणीही भेट देणार आहे. त्यानंतर आपला अहवाल केंद्र सरकारला सादर करणार आहे. देशात कोरोना बाधितांचा आकडा वाढताना दिसत आहे. त्यामुळे चिंता व्यक्त करण्यात येत आहे.
दरम्यान, जगभरात कोरोनाबाधितांचा आकडा २४ लाख ८१ हजारांवर, तर१ लाख ७० हजारांहून अधिक लोकांचा बळी गेला आहे. वाढत्या प्रादुर्भावासंदर्भात WHO कडून चिंता व्यक्त करण्यात आली आहे. आणखी वाईट काळाला सामोरं जावं लागणार आहे, अशी भीती व्यक्त करण्यात आली आहे.