coronavirus : भारतात मृत्यूदर सर्वात कमी - आरोग्य मंत्रालय

कोरोनाच्या वाढणाऱ्या आकडेवारी दरम्यान दिलासादायक बाब...

Updated: Jul 21, 2020, 06:22 PM IST
coronavirus : भारतात मृत्यूदर सर्वात कमी - आरोग्य मंत्रालय title=
फोटो सौजन्य : ANI

नवी दिल्ली : देशात कोरोना व्हायरसच्या रुग्णांची सातत्याने होणारी वाढ मोठी चिंतेची बाब ठरत आहे. मात्र कोरोनाच्या वाढणाऱ्या आकडेवारी दरम्यान एक दिलासादायक बाबही समोर येत आहे. भारतात प्रति 10 लाख लोकसंख्येमध्ये मृत्यूचं प्रमाण 20.4 इतकं असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. जगात हा सर्वाधिक कमी मृत्यूदर असल्याचंही सांगण्यात आलं आहे.

आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, भारतात सध्याच्या घडीला 10 लाख लोकसंख्येमध्ये कोरोना रुग्णांची संख्या 837 इतकी आहे. ही संख्या जगातील इतर देशांच्या तुलनेत अतिशय कमी आहे. 

कोविड-19 पॉझिटिव्हिटी रेट खाली आणण्यासाठी मोठ्या संख्येने कोरोना चाचण्या होणं आवश्यक आहे. भारतात अशाच प्रकारे चाचण्याचं प्रमाण कायम राखण्याचं उद्दीष्ट आहे, जेणेकरुन पॉझिटिव्हिटीचा दर 5 टक्क्यांनी खाली आणता येईल, असंही आरोग्य मंत्रालयाकडून सांगण्यात आलं आहे.

 

N-95 मास्क वापरताय? तर हे एकदा वाचाच...

 

आरोग्य मंत्रालयानुसार, देशात ऍक्टिव्ह कोरोना रुग्णांची संख्या 4 लाख 2 हजार 529 इतकी आहे. तर आतापर्यंत 7 लाख 24 हजार लोक पूर्णपणे कोरोनामुक्त झाले असून त्यांना घरी सोडण्यात आलं आहे.