रांची : देशात कोरोना रुग्णांची संख्या १२ लाखांवर गेलीय. कोरोना संक्रमण थांबवण्यासाठी राज्य सरकारांनी दिलेल्या सवलती परत घेण्यास सुरुवात केलीयं. संक्रमण रोखण्यासाठी अनेक शहरांमध्ये पुन्हा लॉकडाऊन सुरु करण्यात आलंय. दरम्यान झारखंड सरकारने कोविड १९ च्या सुचनांचं उल्लंघन करणाऱ्यांविरोधात कठोर पावित्रा घेतलायं. कॅबिनेटने या निर्णयावर समंती दर्शवली आहे. यानुसार नियम तोडणाऱ्यांना दोन वर्षांची शिक्षा तर एक लाखांपर्यंतचा दंड भरावा लागणार आहे.
हेमंत सोरोने सरकारच्या कॅबिनेट बैठकीत बुधवारी हा निर्णय झाला. या अध्यादेशानुसार कॅबिनेटमध्ये एकूण ३९ प्रस्तावांवर मोहर लावण्यात आली. राज्य सरकारने झारखंडी लोगो लॉंच करण्याचा निर्णय घेतलाय. पळसाच फूल, हत्ती आणि झारखंडी कला संस्कृतीची झलक असलेला लोगो १५ ऑगस्टला लॉंच होईल.
झारखंडमध्ये गेल्या २४ तासामध्ये कोरोनाचे ४३९ जण सापडले आहेत. यामध्ये तिघांचा मृत्यू झालाय. यासोबतच कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या ६ हजार ६८२ झालीय. तसेच आतापर्यंत ६४ जणांचा यामुळे मृत्यू झालाय. सध्या झारखंडमध्ये ३ हजार ५७० जणांवर उपचार सुरु आहेत. तर ३ हजार ०४८ जणांनी कोरोनावर मात केलीयं.
कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी कोरिया सरकार कठोर पाऊल उचलताना दिसतंय. मास्त ने वापरणाऱ्यांना ३ महिने सक्त मजुरीची शिक्षा देण्यात येणार आहे. सरकारच्या या आदेशानंतर लोकांमध्ये खळबळ माजलीय. कारण किम जॉंग उनच्या निर्णयाविरोधात जाण्याची हिम्मत कोणी करणार नाही.
उत्तर कोरिया प्रशासनाने दिलेला निर्णय लागू करण्यासाठी पोलीसांसोबत कॉलेज आणि हायस्कूलमध्ये टीम बनवण्यात आल्या आहेत. या टीम सगळीकडे फिरुन लोकांवर लक्ष ठेवतील. अमेरिकेची वेबसाईट रेडीओ फ्री एशियामध्ये यासंदर्भातील वृत्त देण्यात आलंय. कोरोनाचे संकट पाहता या नियमाचे उल्लंघन करणाऱ्याला ३ महिने सक्त मजुरी करावी लागेल. मग तो कोणीही असो असे उत्तर कोरियाच्या अधिकाऱ्याने सांगितले.