संपूर्ण देशात १७ मेपर्यंत लॉकडाऊन वाढवला

२ आठवडे लॉकडाऊन वाढवण्यात आला

Updated: May 1, 2020, 07:02 PM IST
संपूर्ण देशात १७ मेपर्यंत लॉकडाऊन वाढवला  title=

मुंबई : संपूर्ण देशभरात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता लॉकडाऊन वाढवण्यात आलं आहे. देशात दोन आठवड्यांसाठी लॉकडाऊन वाढवला असून १७ मे पर्यंत लॉकडाऊन वाढवला आहे. ३ मे रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दुसऱ्यांदा वाढवलेला लॉकडाऊन ३ मेपर्यंत होता. मात्र आताच हाती आलेल्या माहितीनुसार लॉकडाऊन आणखी २ आठवडे वाढवला आहे. 

लॉकडाऊनच्या काळातही कोरोनाचा प्रादुर्भाव वाढताना दिसला. या सगळ्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन वाढवण्यात आला आहे. काही ्प्रमाणात नियम शिथिल करण्यात येणार असल्याची देखील माहिती मिळाली. रेड झोनमधील काही नियम शिथिल करण्यात येणार आहेत. 

पंजाबने लॉकडाऊन वाढवणार असल्याचा निर्णय अगोदरच घेतला होता. १७ मे पर्यंत लॉकडाऊन वाढवला आहे. नागरिकांनी या काळातही आता सहकार्य केलं त्याप्रमाणे घरात राहून सहकार्य करायचं आहे. चार तास दुकानं उघडणार असल्यामुळे नागरिकांना आवश्यक वस्तूंची खरेदी करता येणार आहे.