नवी दिल्ली : कोरोना व्हायरसच्या (Coronavirus) उद्रेक दरम्यान एक दिलासादायक बातमी समोर येतेय. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, गुरुवारी रात्री 8 वाजेपर्यंत देशभरात 15.21 कोटी लोकांना कोरोना लस (Corona Vaccine) दिली गेली आहे. तिसर्या टप्प्यात लसीकरणासाठी रेकॉर्डब्रेक बुकिंग झाले. दरम्यान, कोविन पोर्टलवर तिसर्या टप्प्यातील लसीकरणाची नोंदणी 28 एप्रिलपासून सुरू झाली आहे. अवघ्या दोन दिवसांत 2.28 कोटी लोकांनी लसीकरणासाठी नोंदणी केली आहे.
लसीकरण झालेल्या 15.21 कोटी लोकांपैकी 93,85,676 आरोग्यसेवा कर्मचारी आणि 1,24,12,904 फ्रंटलाइन कामगारांना प्रथम डोस देण्यात आला आहे. त्याचबरोबर, 61,89,635 आरोग्यसेवा कामगार आणि 67,04,193 फ्रंटलाइन कामगारांना लसचा दुसरा डोस देण्यात आला आहे.
या व्यतिरिक्त, लसीचा पहिला डोस 45 ते 60 वर्षे वयोगटातील 5,17,23,607 लोकांना आणि दुसरा डोस 34,02,049 लोकांना देण्यात आला आहे. त्याचबरोबर, लसीचा पहिला डोस 5,18,72,503 ज्येष्ठ नागरिकांना देण्यात आला आहे. तर दुसरा डोस 1,04,14,996 देण्यात आला आहे.
देशभरात कोरोनामुळे परिस्थिती आणखीच बिकट होत चालली आहे. गेल्या 24 तासांत देशात कोरोनाची 3,86,452 नवीन प्रकरणे समोर आली आहेत. त्याच वेळी 3,498 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर 2,97,540 लोक कोरोनातून बरे झाले आहेत.
आतापर्यंत भारतात कोरोनाची एकूण 1,87,62,976 केसेस नोंदवल्या गेल्या आहेत. त्याचवेळी मृत्यूची संख्या 2,08,330 वर पोचली आहे. कोरोनातून 1,53,84,418 लोक बरे झाले आहेत. सध्या देशात एक्टीव्ह कोरोना रूग्णांची संख्या 31,70,228 आहे. त्याचबरोबर आतापर्यंत 15,22,45,179 लोकांना कोरोनाची लस देण्यात आली आहे.