Corona : कोरोनाचा पुन्हा धोका वाढल्याने राज्यांना अलर्ट, RTPCR टेस्ट वाढविण्याच्या सूचना

Coronavirus Update: देशात आणि राज्यात कोरोनाचे रुग्ण आढळत असल्याचने  पुन्हा चिंता व्यक्त करण्यात आली आहे. केंद्र सरकारने राज्यांना अलर्ट जारी केला आहे. तसेच कोरोना चाचणी वाढविण्याच्याही सूचना केल्या आहेत.

Updated: Mar 28, 2023, 08:35 AM IST
Corona : कोरोनाचा पुन्हा धोका वाढल्याने राज्यांना अलर्ट,  RTPCR टेस्ट वाढविण्याच्या सूचना

Coronavirus Update: कोरोनासंदर्भात सगळ्या राज्यांनी अलर्ट राहावं आणि कोरोनाच्यादृष्टीनं आवश्यक ती सगळी तयारी ठेवावी, अशा सूचना केंद्रानं दिल्या आहेत. राज्यांना RTPCR टेस्ट आणि जिनोम सिक्वेन्सिंग वाढवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. टेस्ट, ट्रॅक, ट्रीट आणि व्हॅक्सिनेटचं पालन करायला केंद्रानं राज्यांना सांगितले आहे. कोरोनासंदर्भाली नवी सूत्र केंद्राने राज्यांना दिली आहेत.  केंद्र सरकारने सर्व राज्यांना चाचणी वाढविण्याचे आणि त्यांच्या तयारीची चाचणी घेण्यासाठी मॉक ड्रिल आयोजित करण्याचे आवाहन केले आहे. 

4 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू

देशात पुन्हा कोरोनाचे रुग्ण वाढले आहेत. गेल्या 24 तासात 4 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये तीन रुग्ण उत्तर भारतातील आहेत. त्याचवेळी, या कालावधीत देशात 1805 नवीन रुग्ण आढळले. गेल्या 7 दिवसात 6.57 लाखांहून अधिक नवीन रुग्ण सापडले आहेत. तर  जगात 4338 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. देशभरात कोरोना व्हेरिएंटच्या नवीन प्रकारातील XXB 1.16 चे आहेत. भारतीय SARS-CoV-2 जेनोमिक्स कन्सोर्टियमच्या डेटामध्ये ही माहिती देण्यात आली आहे. परिस्थिती पाहून केंद्र सरकारने राज्यांना कोरोना लसीकरणाचा वेग वाढवून कोरोना प्रोटोकॉल लागू करण्याचे आवाहन केले आहे.  

कोरोना रुग्णसंख्या 10 हजारांवर 

भारतीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, सध्या भारतात कोरोनाचे सक्रिय रुग्ण 10 हजार 300 आहेत. त्यापैकी सर्वाधिक 2471 केसेस केरळमधील आहेत. त्यानंतर महाराष्ट्रात 2117, गुजरातमध्ये 1697, कर्नाटकात 792, तामिळनाडूमध्ये 608, दिल्लीत 528 रुग्ण आढळले आहेत. गेल्या 24 तासांत जिथून मृत्यूची नोंद झाली आहे. दक्षिण आणि मध्य भारतानंतर आता उत्तर भारतातही कोरोनाचे वर्चस्व आहे. उत्तर प्रदेस, चंदीगड, हिमाचल आणि गुजरातमध्ये प्रत्येकी एक मृत्यू नोंदवला गेला आहे.  

मागील तीन वर्षांचा विचार केल्यास अमेरिकेनेतंत भारतात (44,705,952) कोरोना रुग्णांची सर्वाधिक संख्या आहे. जगात भारत सध्या सातव्या क्रमांकावर आहे. गेल्या 24 तासांच्या आकडेवारीचा विचार करता रशियामध्ये (10940) पहिल्या क्रमांकांवर आहे., दक्षिण कोरियामध्ये 9,361, जपानमध्ये 6,324, फ्रान्समध्ये 6,211, चिलीमध्ये 2,446, ऑस्ट्रियामध्ये 1,861 आणि त्यानंतर सातव्या स्थानावर भारत 1,805 आहे.

चीनमध्ये 9.9 कोटी लोकांना कोरोना

भारतात पुन्हा कोरोना रुग्णवाढत असताना चीनमधील धोका कमी झालेला नाही. भारतात कोरोना नियंत्रणात आला असताना चीनमध्ये कोरोनाची रुग्णसंख्या झपाट्याने वाढताना दिसत होती. चीनने अद्याप कोणताही विश्वासार्ह डेटा शेअर केला नसला तरी WHO नुसार चीनमध्ये कोरोना बाधितांची संख्या 9.9 कोटींवर पोहोचली आहे. चीनमध्ये जवळपास 120,775 लोकांचा मृत्यू झाला आहे. चीनमध्ये गेल्या सात दिवसांत 54,449 लोकांना संसर्ग झाला आहे.