Crime News: 30 सेकंदात चोरट्यांनी उडवली बाईक; या कानाचा त्या कानाला पत्ता नाय; पाहा CCTV VIDEO

CCTV Video Crime News: दुचाकीवरून आलेल्या तीन चोरट्यांनी सुनार गलीतील भैरव मंदिर परिसरात ठेवलेली दुचाकी फक्त 30 सेकंदात (Thieves stole bike in 30 seconds) चोरली. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. 

Updated: Mar 27, 2023, 10:22 PM IST
Crime News: 30 सेकंदात चोरट्यांनी उडवली बाईक; या कानाचा त्या कानाला पत्ता नाय; पाहा CCTV VIDEO
CCTV Video Crime News

Thieves stole bike in 30 seconds: गेल्या काही दिवसांपासून देशभर चोऱ्यामाऱ्याच्या घटनांमध्ये (Theft Cases) मोठी वाढ झाल्याचं पहायला मिळतंय. त्यामुळे आता पोलीस यंत्रणा देखील अॅक्टिव मोडवर असल्याचं दिसून येतंय. अशातच आता राजस्थानमधून ( Rajastan Crime News) धक्कादायक बातमी समोर आली आहे. फक्त 30 सेकंदात चोरट्यांनी बाईक उडवल्याची घटना घडली आहे. त्याचा सीसीटीव्ही व्हिडीओ (CCTV Video) सध्या तुफान व्हायरल होतोय. (Watch Thieves stole bike in 30 seconds video recorded in cctv Rajastan Crime News )

बारी शहरात सध्या चोर घरात घुसून दुचाकी चोरत असल्याच्या घटना वाढत चालल्या आहेत. सध्याचं हे प्रकरण बारी शहरातील सुनार गली येथील आहे. जिथं दुचाकीवरून आलेल्या तीन चोरट्यांनी सुनार गलीतील भैरव मंदिर परिसरात ठेवलेली दुचाकी फक्त 30 सेकंदात (Thieves stole bike in 30 seconds) चोरली. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. 

सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये चोरट्यांनी दुचाकी पळवून नेली. या घटनेनंतर सुनार गली येथील रहिवासी अविनाश पचौरी यांनी कोतवाली पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. नेमकं काय झालं?

झालं असं की...

नेहमीप्रमाणे, 1 दुचाकी भैरव बाबा मंदिराच्या गेटच्या आतमध्ये लावून ठेवली होती. दुपारच्या वेळात एका दुचाकीवर 3 चोरटे आले. कुलूप बंद असलेल्या गेटमधून चोर आत आले आणि मंदिराच्या आवारात ठेवलेली दुचाकी पाहून थांबले. त्यांनी कुलूप तोडलं होतं. 3 चोरांपैकी 1 चोर बाईक घेऊन पुढे गेला. मंदिराच्या आवारात ठेवलेली दुचाकी 2 चोरट्यांनी काही सेकंदातच चोरली.

पाहा Video -

दरम्यान, चोरीची ही संपूर्ण घटना तिथे लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात (CCTV VIDEO) कैद झाली आहे. दुचाकी चोरीच्या घटनेबाबत तक्रार दाखल करण्यात आली आहे. गुन्हा दाखल करून कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने पोलीस चोरांपर्यंत पोहोचण्याच्या प्रयत्नात आहेत. पोलिसांनी फुटेज ताब्यात घेतलं असून चोरांना लवकर पकडू असं आश्वान दिलंय.