गव्हाच्या पीठाबरोबर चहासोबत खात असलेली बिस्किटे महाग

Biscuits and wheat flour are expensive : आता बातमी सर्वसामान्यांच्या जीभेला चटका देणारी. नाष्टा महाग झाला आहे. चहासोबत आपण खात असलेली बिस्किटे महाग झाली आहेत.  

Updated: Mar 16, 2022, 02:20 PM IST
गव्हाच्या पीठाबरोबर चहासोबत खात असलेली बिस्किटे महाग  title=

मुंबई : Biscuits and wheat flour are expensive : आता बातमी सर्वसामान्यांच्या जीभेला चटका देणारी. नाष्टा महाग झाला आहे. चहासोबत आपण खात असलेली बिस्किटे महाग झाली आहेत. तसेच सर्वसामान्यांचा नाष्टा म्हणून ओळख असलेला वडापाव 5 ते 7 रुपयांनी महागला आहे. तर युद्धाचा फटका सर्वसामान्यांना बसू लागला आहे. युद्धामुळे गव्हाच्या निर्यातीवर परिणाम झाला आहे. त्यामुळे गव्ह्याचे पदार्थ महागले आहेत.

जीभेचे चोचले पुरवताना आता आखडता हात घ्यावा लागणार आहे. महागाईचा भडका दिवसागणित उडत आहे. यात मॅगीही मागे राहिलेली नाही.12 रुपयांना मिळालेली मॅगी 14 रुपयांना मिळणार आहे. मॅगीच्या उत्पादन खर्चात वाढ झाल्यानं मॅगी महागली आहे. आता तर गव्हाचं पीठ, बिस्कीटेही महागली आहेत.

रशिया-युक्रेन युद्धाचा परिणाम जागतिक बाजारपेठेवर पाहायाला मिळत आहे. मॅगीनंतर आता गव्हाचे पीठ आणि बिस्कीटही महागली आहेत. त्यामुळे, गव्हाच्या सर्वच पदार्थांच्या दरात वाढ झाली आहे. युद्धामुळे गव्हाच्या निर्यातीवर परिणाम झाला आहे. जागतिक बाजारपेठेत 29 टक्के गव्हाचा वाटा आहे तर, 19 टक्के मक्याचा वाटा आहे. 

युक्रेन-रशिया युद्धामुळे गेल्या 10 दिवसांत गव्हाच्या दरात विक्रमी वाढ झालीये. क्विंटलमागे 350 ते 400 रुपयांची वाढ झाली आहे. रशिया हा जगातील सर्वात मोठा गहू उत्पादक देश आहे. मात्र  आर्थिक निर्बंधांमुळे रशियातून निर्यात बंद झाली आहे. तर तिसऱ्या क्रमांकाचा निर्यातदार असलेल्या युक्रेनमधूनही निर्यात बंद झाली आहे. सध्या काढणीचा हंगाम सुरू आहे. अशा वेळी खरंतर दर कमी असतात. मात्र निर्यातीत मोठी वाढ झाल्यामुळे गव्हाचे भाव चढेच राहिलेत. आगामी काळात भाव आणखी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.