Couple Viral Video : जीवघेणा रोमान्स! स्पोर्ट्स बाइकवर तरुणीने तरुणीला गुलाब दिला आणि...

Couple Viral Video :  सोशल मीडियाचं क्रेझ दिवसेंदिवस जीवघेणं होतं चाललं आहे, असं दिसतं आहे. गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर बाइकवर स्टंट करतानाचे अनेक व्हिडीओ व्हायरल होतं आहेत. त्यातच सगळ्यात जास्त धुमाकूळ बाइकवरील रोमान्स व्हिडीओने घातला आहे.

Updated: Jan 25, 2023, 12:18 PM IST
Couple Viral Video : जीवघेणा रोमान्स! स्पोर्ट्स बाइकवर तरुणीने तरुणीला गुलाब दिला आणि... title=
couple romance on running sports bike hug kiss and rose propose video viral on social media

Couple Romance on Bike Viral Video :  सोशल मीडियावर प्रसिद्ध (Famous on social media) होण्यासाठी आणि पैसे कमविण्यासाठी यूजर्स रील्ससाठी (Reels) एकशेएक आयडिया शोधून काढतं आहेत. पण काही तरुण मंडळी जीवघेण्या स्टंटला (video viral on social media) बळी पडताना दिसतं आहेत. गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर धावत्या बाइक, स्कूटर अगदी कारच्या रुफटॉपवर रोमान्स करताना दिसून येतं आहे. तर दुसरीकडे देशात थंडीचा कहर वाढल्यानंतर धावत्या बाइकवर शेकोटी पटवून फिरणारे पठ्ठेदेखील आपण पाहिले. आता सोशल मीडियावर अजून एक व्हिडीओ व्हायरल (bike couple Romance Video) होतो आहे. ज्यात स्पोर्ट्स बाइक तरुण तरुणीला प्रपोज करताना दिसतं आहे.

जीवघेणा रोमान्स!

या व्हिडीओमध्ये (Stunt Video) तुम्ही पाहू शकता एका स्पोर्ट्स बाइकवर हेल्मेट (helmet) घालून कपल जातं आहे. आजूबाजूला सुंदर निसर्गाच्या आनंद घेण्यासाठी तरुणी बाइकच्या पेट्रोलच्या टंकीवर उलटी तरुणाला घट्ट मिठ्ठी मारून बसली आहे. थोड्याच दूर गेल्यावर तरुण धावत्या बाइकवर हात सोडतो आणि मागे वाकतो...क्षणात तरुणीला काही कळण्यापूर्वी तो लाल गुलाबाचे फुल काढतो आणि तिला प्रपोज करतो. तरुणी हे पाहून एकदम आनंदाने बहरुन जाते आणि त्याला फ्लाइंग किस (Flying Kiss) देते. (couple romance on running sports bike hug kiss and rose propose Stunt video viral on social media)

तुम्ही असं काही करु नका!

सोशल मीडियावर रील्स बनविण्यासाठी आणि आपण लवकरच प्रेमाचा दिवस साजरा (Valentines Day 2023) करणार आहोत. तेव्हा आपल्या प्रेयसीला हटके प्रपोज करण्यासाठी असला जीवघेणा स्टंटमुळीच करु नका.

हा व्हिडीओ (Instagram video) इन्स्टाग्रामवर mr_black_heart_boy73andkohinoor_akhilesh_kashyap या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे.  या अकाऊंटवर एक नजर टाकली तर तुम्हाला कळेल की बाइकवरील वेगवेगळे स्टंट करतानाचे अनेक रील्सचे व्हिडीओ दिसून येतील. या तरुणांना याची कल्पना नाही का, की त्यांच्या एका चुकीने त्यांचा जीव जावू शकतो.