Covid-19 : सरकारकडून नवीन गाईडलाईन्स जारी, आता याची गरज नाही!

Covid-19 Guidelines : कोरोनाचा संसर्ग कमी होत आहे. त्यामुळे निर्बंधात सूट देण्यात आली आहे. आता केंद्राच्या नव्या गाईडलाईन्स जारी करण्यात आल्या आहेत. 

Updated: Feb 10, 2022, 01:05 PM IST
Covid-19 : सरकारकडून नवीन गाईडलाईन्स जारी, आता याची गरज नाही! title=

नवी दिल्ली : Covid-19 Guidelines : कोरोनाचा संसर्ग कमी होत आहे. त्यामुळे निर्बंधात सूट देण्यात आली आहे. आता रेल्वे, विमान प्रवासातून आता आरटीपीसीआरपासून (RT-PCR) मुक्ती मिळणार आहे. केंद्राच्या नव्या गाईडलाईन्स जारी करण्यात आल्या आहेत.

सरकारने नवीन कोविड-19 मार्गदर्शक तत्त्वे जारी करताना आता RT-PCR ची 72 तासांपूर्वीची टेस्ट अनिवार्य असणार नाही. मात्र, संपूर्ण लसीकरण प्रमाणपत्र बंधनकारक असणार आहे. At Risk चे मार्किंगही समाप्त करण्यात आले आहे. नवीन मार्गदर्शक तत्त्वानुसार, RT-PCR चा 72 तासांचा अनिवार्य अहवाल यापुढे आवश्यक नाही आणि प्रवासी त्यांचे संपूर्ण लसीकरण प्रमाणपत्र दाखवू शकतात. ज्या प्रवाशांनी हवाई सुविधा पोर्टलवर सेल्फ डिक्लेरेशन फॉर्ममध्ये सर्व माहिती भरली आहे आणि निगेटिव्ह RT-PCR चाचणी अहवाल किंवा कोविड -19 लसीकरण प्रमाणपत्र अपलोड केले आहे, अशा प्रवाशांना एअरलाइन्स बोर्डिंगची परवानगी असणार आहे.

तसेच हाय रिस्क ओमिक्रॉन असलेल्या विविध देशांसाठी सरकारने 'अॅट रिस्क' (At Risk) मार्किंग काढून टाकले आहे. सरकारने 7 दिवसांचे अनिवार्य क्वारंटाईन नियम देखील काढून टाकले आहेत आणि सर्व प्रवासी आगमनाच्या पुढील 14 दिवसांसाठी त्यांच्या आरोग्याची स्वत:ची देखरेख घरीच करतील.