Covid 19 : अनेक देशांमध्ये झपाट्याने वाढतोय Omicron, 80% लोकांमध्ये दिसले हे विचित्र लक्षण

Omicron symptom : अनेक देशांमध्ये कोरोनाचा संसर्ग पुन्हा एकदा वाढू लागला आहे.  

Updated: Mar 21, 2022, 05:56 PM IST
Covid 19 : अनेक देशांमध्ये झपाट्याने वाढतोय Omicron, 80% लोकांमध्ये दिसले हे विचित्र लक्षण title=

Omicron symptom: कोरोना विषाणूचा संसर्ग पुन्हा एकदा वाढू लागला आहे. चीन आणि युरोपातील काही देशांमध्ये तो झपाट्याने वाढतो आहे. तिसर्‍या लाटेचे मुख्य कारण असलेला ओमायक्रॉन प्रकार पुन्हा एकदा जीवघेणा ठरत आहे. ओमायक्रॉन विषाणूनचा नवा व्हेरिएंट सध्या झपाट्याने पसरतो आहे. Omicron sub variant BA.2 युरोप आणि आशियाच्या काही देशांमध्ये कहर करत आहे. चीनमध्ये पुन्हा एकदा वाईट परिस्थिती ओढावत आहे.

ओमायक्रॉन प्रकार डेल्टासारखा प्राणघातक नाही. परंतु तो वेगाने पसरतो. काही वेळातच तो अनेक देशांमध्ये पसरला आहे. चीनसह दक्षिण कोरिया, हाँगकाँग, फ्रान्स, ब्रिटन आणि इटलीमध्ये त्याची प्रकरणे वेगाने वाढत आहेत.

'ऑफिस ऑफ नॅशनल स्टॅटिस्टिक्स'च्या कोविड-19 संसर्ग सर्वेक्षणाच्या आकडेवारीनुसार, संपूर्ण यूकेमध्ये प्रकरणे वेगाने वाढली आहेत. ZOE कोविड अॅपचे प्रमुख प्रोफेसर टिम स्पेक्टर यांनी सांगितले की, गेल्या काही आठवड्यांपासून ओमायक्रॉनची प्रकरणे पुन्हा वाढू लागली आहेत. आश्चर्याची गोष्ट म्हणजे यावेळी एक विचित्र लक्षण रुग्णांवर सर्वाधिक परिणाम करत आहे. 

80 टक्के लोकांमध्ये दिसून येतात ही लक्षणं

ZOE कोविड नुसार, 80 टक्के कोरोना रुग्णांमध्ये सर्दी हे सर्वात सामान्य लक्षण असल्याचे आढळून आले आहे. प्रोफेसर स्पेक्टर म्हणतात की, हे धक्कादायक आहे. त्यांनी स्पष्ट केले की हे सूचित करते की ओमायक्रॉन प्रकार प्रत्यक्षात नाकावर परिणाम करतो. या यूके अॅपवर दर आठवड्याला दहा लाख लोक त्यांची लक्षणे नोंदवतात.

Omicron च्या या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका

कोरोनाशी संबंधित या यूके हेल्थ अॅपमध्ये ओमाक्रॉनची अनेक लक्षणे नमूद करण्यात आली आहेत. अॅपनुसार, नाक वाहण्याव्यतिरिक्त, इतर अनेक लक्षणे आहेत ज्याकडे दुर्लक्ष केले जाऊ नये. 

घसा खवखवणे
डोकेदुखी
सतत खोकला
गोंधळलेला आवाज
रात्री घाम येणे आणि थंडी वाजणे
थकवा आणि शरीर आणि सांधेदुखी

यूकेच्या आरोग्य अधिकार्‍यांच्या मते, नवीन प्रकरणांमध्ये वाढ होण्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे लॉकडाऊनमध्ये शिथिलता  आणि निर्बंध उठवणे. त्यांनी आवश्यक ती सर्व खबरदारी घेण्याचा सल्ला दिला आहे. सध्या ओमायक्रॉनचे अनेक प्रकार एकाच वेळी आक्रमण करत आहेत, ज्यामुळे गंभीर गुंतागुंत होऊ शकते. हे टाळण्यासाठी, नियमितपणे मास्क घाला, गर्दी टाळा, हात धुत रहा. ज्यांना अद्याप लस मिळालेली नाही त्यांनी ताबडतोब करून घ्या.

संबधित बातमी : Corona फक्त 3 दिवसात 11 लाख रुग्ण वाढल्याने या देशात खळबळ, भारताला किती धोका?