Covid Booster Shot Appointment: चीनसह इतर काही देशांमध्ये गेल्या काही दिवसात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. भारतातही अलर्ट जारी करण्यात आला आहे. कोरोनाच्या नव्या व्हेरियंटचे रुग्ण भारतातही आढळले आहेत. कोरोना व्हायरस BF7 व्हेरियंट ओमायक्रॉनचा सब व्हेरियंट आहे. नुकतीच केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने बैठकीचं आयोजन केलं होतं. या बैठकीत कोविड गाइडलाइन्सचा आढावा घेण्यात आला. अशात कोरोना लसीकरण आणि बुस्टर डोस घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे. त्यामुळे दोन लस घेतलेल्यांना बुस्टर डोस कुठे आणि कसा मिळणार याबाबत प्रश्न पडला आहे. चला तर जाणून घेऊयात...
बातमी वाचा- Corona लसीचा चौथा डोस घेण्याची आवश्यकता आहे का? जाणून घ्या तज्ज्ञांचं मत
आतापर्यंत 74 टक्के लोकांनी लसीचा पहिला डोस आणि 68 टक्के लोकांनी लसीचा दुसरा डोस घेतला आहे. तर 27 टक्के लोकांनी बुस्टर म्हणजेच तिसरा डोस (Booster Dose) घेतलेला आहे. गेल्या वर्षी कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत अनेकांना जीव गमवावा लागला होता. त्यानंतर दोन लस घेतल्यानंतरही बुस्टर डोस घ्या, अशा सूचना करण्यात आल्या होत्या. मात्र कोरोनाचा फैलाव पाहता लसीचा चौथा डोस घेण्याची आवश्यकता आहे का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. यावर दिल्लीच्या IHBAS रुग्णालयाचे माजी रेसिडेंट डॉ. इम्रान अहमद (Dr. Imran Ahamad) यांनी सांगितलं की, "ज्या लोकांनी कोरोना लसीचा बूस्टर म्हणजेच तिसरा डोस घेतला नाही, त्यांनी लवकरात लवकर लस घ्यावी. पण सध्या तरी चौथ्या डोसची आवश्यकता दिसत नाही."