Corona लसीचा चौथा डोस घेण्याची आवश्यकता आहे का? जाणून घ्या तज्ज्ञांचं मत

Corona BF.7 Varient: कोरोनाचं संकट अजूनही टळलेलं नाही असंच दिसत आहे. चीनसह इतर देशांमध्ये कोरोना रुग्ण वाढत आहेत. भारतात देखील कोरोना व्हेरियंट BF.7 (Corona Varient) चे रुग्ण आढळल्याने केंद्र आणि राज्य सरकार अलर्ट झालं आहे. अधिकाऱ्यांच्या जोर बैठका सुरु आहेत. भारतात जानेवारी 2021 पासून लसीकरण (Covid Vaccine) मोहीम सुरु करण्यात आली होती. 

Updated: Dec 22, 2022, 12:43 PM IST
Corona लसीचा चौथा डोस घेण्याची आवश्यकता आहे का? जाणून घ्या तज्ज्ञांचं मत title=

Corona BF.7 Varient: कोरोनाचं संकट अजूनही टळलेलं नाही असंच दिसत आहे. चीनसह इतर देशांमध्ये कोरोना रुग्ण वाढत आहेत. भारतात देखील कोरोना व्हेरियंट BF.7 (Corona Varient) चे रुग्ण आढळल्याने केंद्र आणि राज्य सरकार अलर्ट झालं आहे. अधिकाऱ्यांच्या जोर बैठका सुरु आहेत. भारतात जानेवारी 2021 पासून लसीकरण (Covid Vaccine) मोहीम सुरु करण्यात आली होती. आतापर्यंत 74 टक्के लोकांनी लसीचा पहिला डोस आणि 68 टक्के लोकांनी लसीचा दुसरा डोस घेतला आहे. तर 27 टक्के लोकांनी बुस्टर म्हणजेच तिसरा डोस (Booster Dose) घेतलेला आहे. गेल्या वर्षी कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत अनेकांना जीव गमवावा लागला होता. त्यानंतर दोन लस घेतल्यानंतरही बुस्टर डोस घ्या, अशा सूचना करण्यात आल्या होत्या. मात्र कोरोनाचा फैलाव पाहता लसीचा चौथा डोस घेण्याची आवश्यकता आहे का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. यावर दिल्लीच्या IHBAS रुग्णालयाचे माजी रेसिडेंट डॉ. इम्रान अहमद (Dr. Imran Ahamad) यांनी सांगितलं की, "ज्या लोकांनी कोरोना लसीचा बूस्टर म्हणजेच तिसरा डोस घेतला नाही, त्यांनी लवकरात लवकर लस घ्यावी. पण सध्या तरी चौथ्या डोसची आवश्यकता दिसत नाही."

काय आहे बायवेलेंट व्हॅक्सिन? 

डॉक्टर इम्रान यांनी सांगितले की, जर परिस्थिती आणखी बिघडली तर बायव्हॅलेंट लस तयार केली जाऊ शकते. अन्न आणि औषध प्रशासन (FDA) च्या मते, ही लस मुख्य विषाणूचा एक घटक आणि ओमिक्रॉन विषाणूचा एक घटक मिसळून तयार केली जाते. याद्वारे, संसर्गापासून अधिक संरक्षण मिळू शकते. ही प्रत्यक्षात बूस्टर डोसची अॅडव्हान्स वर्जन आहे. आता भविष्यात कोरोनाचे गांभीर्य पाहूनच नवीन लस विकसित करता येईल. चीन आणि इतर देशातील परिस्थिती पाहता आरोग्य मंत्रालयाने लोकांना काळजी घेण्याचे सूचना केल्या आहेत. 

बातमी वाचा- कोरोना रुग्णांमुळे चिंता वाढली, सिरमचे CEO Adar Poonawala यांनी सांगितलं की, "लोकांनी..."

आरोग्य मंत्रालयाचे निर्देश

  • सर्वात आधी कोरोना लसीची तिसरी लस म्हणजेच बुस्टर डोस घ्यावा
  • सर्दी आणि ताप असल्यास तात्काळ टेस्ट करावी
  • सोशल डिस्टेंसिंगचा पालन करावं.
  • गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळा आणि मास्क घाला.

(Disclaimer: येथे दिलेली माहिती तज्ज्ञांच मत आहे. ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही.)