मोफत रेशन आणि रिक्षा-टॅक्सी ड्रायव्हर्सना 5 हजारांची मदत, 'या' सरकारचा मोठा निर्णय

राज्यासाठी आज महत्वपूर्ण घोषणा

Updated: May 4, 2021, 01:21 PM IST
मोफत रेशन आणि रिक्षा-टॅक्सी ड्रायव्हर्सना 5 हजारांची मदत, 'या' सरकारचा मोठा निर्णय

नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Delhi Chief Minister Arvind Kejriwal)यांनी आज महत्वपूर्ण घोषणा केल्या. कोरोना काळामध्ये दिल्लीतील (Covid-19 in Delhi) जनतेला भेडसावणाऱ्या अडचणी लक्षात घेता त्यांनी प्रमुख निर्णय जाहीर केले.

यानुसार, दिल्लीतील रेशनकार्डधारकांना पुढील दोन महिन्यांसाठी मोफत रेशन दिले जाणार आहे. दिल्लीत सुमारे 72 लाख शिधापत्रिकाधारक आहेत.  लॉकडाउन दोन महिने चालेल असा याचा अर्थ नसल्याचे केजरीवाल यांनी म्हटले. 

लॉकडाऊन दरम्यान गरिबांना जास्तीत जास्त आर्थिक संकटाचा सामना करावा लागतो. म्हणून आम्ही टॅक्सी आणि वाहन चालकांना 5000 रुपयांची आर्थिक मदत देऊ. यामुळे एक लाख 65 हजार वाहनचालकांना मदत होईल असे केजरीवाल म्हणाले. सरकारच्या या निर्णयामुळे दिलासा मिळणार आहे.

भारतात एकाच दिवसात कोरोनाच्या (Covid-19)3,57,229 केसेस समोर आल्या. तसेच एकूण संख्या 2 कोटींच्यावर गेली आहे. घटनांसह एकूण संक्रमणाची संख्या दोन कोटींच्या पुढे गेली आहे. 3,449 लोकांचा मृत्यू झाल्याने मृत्यूची संख्या 2,22,408 वर पोहोचली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने (Union Ministry of Health) आज जाहीर आकडेवारी जाहीर केली.

यानुसार कोविड 19 मधील देशातील रुग्णांची संख्या वाढून 2,02,82,833 झाली आहे.