कोविशिल्डच्या २ लस घेण्यात अंतर वाढलं तर फायदा कसा होतो? जाणून घ्या

भारत सरकारने पहिल्या डोसनंतर दुसऱ्या डोसमधील अंतर 12 ते 16 आठवड्यांपर्यंत वाढवला आहे. 

Updated: May 14, 2021, 08:14 PM IST
कोविशिल्डच्या २ लस घेण्यात अंतर  वाढलं तर फायदा कसा होतो? जाणून घ्या

मुंबई : भारत सरकारने पहिल्या डोसनंतर दुसऱ्या डोसमधील अंतर 12 ते 16 आठवड्यांपर्यंत वाढवला आहे.  मेडिकल जर्नल आणि पब्लिक हेल्थ स्टडी लंडनने प्रसारित केलेल्या वृत्तानुसार लसीची एफिकेसी आणि शरीरातिल एंटीबॉडीचं प्रमाण कसं वाढतं हे जाणून घेवू.  6 आठवड्यांनंतर दुसरा डोस घेतला की  लसीची  एफिकेसी 55.1 टक्के असते. पण 6 ते 12 आठवड्यांमध्ये दुसरी लस घेतल्यानंतर एफिकेसी 80.3 टक्क्यांनी वाढते. यावरून असं कळतं की शरीरातील संरक्षण शक्ती  25 टक्क्यांनी आणखी मजबूत होते.

 एवढंच नाही तर 55 वर्षांपेक्षा कमी वयोगटातील नागरिकांना 12 आठवड्यांनंतर लसीचा दुसार डोस दिल्यास शरीरातील एंटीबॉडीचं प्रमाण दुप्पट होण्यास मदत होते. शरीरातील एंटीबॉडीचं  प्रमाण वाढल्यामुळे कोरोना व्हायसरशी लढण्यास मोठ्या प्रमाणात मदत होते. त्यामुळे कोविशिल्ड लसीच्या दोन डोसमधील अंतर  6 ते 12 आठवडे एवढं असलं पाहिजे. 

ऑक्सफोर्ड यूनिवर्सिटीने सांगितल्याप्रमाणे, पहिल्या लसीनंतर दुसरा डोस 6 आठवड्यांमध्ये घेतल्यास लसीची एफिकेसी  54.9 टक्के असते. पण 12 आणि अधिक आठवड्यांनंतर लसीचा दुसरा डोस घेतल्यास लसीची एफिकेसी 82.4 असते. त्यामुळे ऑक्सफोर्ड यूनिवर्सिटीच्या संशोधनात कोविशिल्ड लसीच्या दोन डोसमधील अंतर 6 ते 12 आठवड्यांचा असावा. 

इतकेच नाही तर लॅन्सेटमध्ये प्रकाशित झालेल्या संशोधनानुसार 22 ते 90 दिवसांमध्ये  एंटीबॉडी प्रमाण 76 टक्क्यांवर पोहोचतो. त्यामुळे पहिल्या लसीकरणानंतर दुसरा डोस 12 आठवड्यांनंतर घेतल्यास त्याचा अधिक फायदा होतो. ब्रिटेनमध्ये देखील मार्च महिन्यात कोविशिल्डच्या दोन डोसमधील अंतर 12 आठवड्यांनी वाढवलं आहे.