गिटार ऐकत ऐकत महिलेच्या मांडीवर गाय झोपली, आणि पुढे काय झालं पाहा व्हिडीओ

गिटार ऐकून गाय मंत्रमुग्ध... अखेर महिलेच्या मांडीवर गायीनं टेकलं डोकं आणि... तुम्हीच पाहा पुढे काय झालं व्हिडीओ

Updated: Jul 30, 2021, 04:43 PM IST
गिटार ऐकत ऐकत महिलेच्या मांडीवर गाय झोपली, आणि पुढे काय झालं पाहा व्हिडीओ title=

मुंबई: श्री कृष्णाच्या बासरीनं मंत्रमुग्ध झालेल्या गायीचा फोटो किंवा व्हिडीओ अनेकदा इंटरनेटवर पाहिला असेल. प्राण्यांनाही संगीत आवडतं आणि तेही त्या संगीतावर ठेका धरतात असे व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. असाच एक गायीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

ही गाय महिलेच्या मांडीवर डोकं ठेवून झोपली आहे. महिलेच्या हातात गिटार आहे आणि ती खूप सुंदर धून या गिटारवर वाजवत आहे. गाय गिटार ऐकून मंत्रमुग्ध झाल्याचं या व्हिडीओमध्ये दिसत आहे.  मांडीवर गायीनं डोकं टेकून ती आणि शांत झोपल्याचं या व्हिडीओमध्ये दिसत आहे. गिटारची धून या गायीलाही आवडल्याचं या व्हिडीओमध्ये दिसत आहे.  

या व्हिडीओमध्ये गायीला ही धून खूप आवडल्याचं दिसत आहे. IFS सुधा रमन यांनी हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. जनावरं किंवा प्राण्यांवर प्रेम करण्याचा संदेशही या व्हिडीओमधून अप्रत्यक्षपणे देण्यात आला आहे. गिटारची ही धून गायीला आवडल्यानं सुरुवातीला गाय मान डोलवते मात्र नंतर ती शांतपणे झोपी जाते. 

याआधी सोशल मीडियावर बासरीची धून ऐकून गायी पळत यायचा असा एक व्हिडीओ खूप व्हायरल झाला होता. बासुरीच्या धूनवर गायी डोलतानाचं विलोभनीय दृश्यं सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.