मुंबई : 1 मेपासून लसीकरणाच्या तिसर्या टप्प्यातील नोंदणीसाठी मोठ्या प्रमाणात नोंदणी करण्यात आली. 18 वर्षावरील लोकांसाठी 1 मे पासून लसीकरण सुरु होणार असून त्यासाठी आजपासून नोंदणीला सुरुवात झाली आहे. पण पहिल्याच दिवशी कोविन App क्रॅश झालं. लोक नोंदणीसाठी समस्यांचा सामना करताना दिसले.
18 ते 45 वयोगटातील लोकांना 1 मेपासून लस घेता येणार आहे. या टप्प्यात राज्य आणि खासगी रुग्णालये थेट कंपन्यांकडून लस खरेदी करुन लसीकरण करु शकणार आहेत. कोरोना लसीचे दर ही राज्यांसाठी कमी करण्यात आले आहेत.
तिसर्या टप्प्यातील नोंदणी मंगळवारी सुरू झाली. कोविन प्लॅटफॉर्म अचानक आलेल्या इतक्या मोठ्या प्रमाणात नोंदणीमुळे क्रॅश झाला.
कोणत्या लसीकरण केंद्रावर किती डोस उपलब्ध आहेत हेही राज्यांना सांगावे लागणार आहेत. जेणेकरून तरुणांना लसीकरण केंद्रासह त्यांना किती वाजता आणि कोणत्या दिवशी लस घेता येणार आहे. याची माहिती मिळणार आहे.
जेव्हा लसीकरण केंद्र आणि तिथल्या डोसची माहिती राज्यांना अद्ययावत करावे लागणार आहे. येत्या काही दिवसांत ही संपूर्ण प्रक्रिया सुरळीत सुरू होईल, अशी आशा आरोग्य मंत्रालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.