नवी दिल्ली : देशाची राजधानी असलेल्या दिल्लीतील श्रेष्ठ विहार परिसरातील घटना.
किडनॅप केलेल्या विद्यार्थ्याला पोलिसांनी सोमवारी रात्री उशिरा आरोपींच्या तावडीने सोडवले. दिल्ली पोलिसांच्या क्राईम ब्रांचच्या टीममधील ही घटना. पोलिसांनी विरोध दर्शवण्यासाठी केलेल्या फायरिंगमध्ये एका आरोपीचा मृत्यू झाला असून 2 जण जखमी झाले आहे. जखमी झालेल्यामधील दोघांची नावे पंकज आणि नितीन असं सांगण्यात येत आहे.
A Crime Branch team of Delhi Police rescued a child from Ghaziabad last night where he was kidnapped & held captive. 1 arrested, another injured & a 3rd kidnapper killed after they opened fire on police & they retaliated. Child handed over to his parents. Investigation underway.
— ANI UP (@ANINewsUP) February 6, 2018
24 जानेवारीला बाईकवरून आलेल्या दोन चोरांनी स्कूल बसच्या ड्रायव्हरला गोळी मारून एका मुलाला किडनॅप केलं. ही स्कूल बस विवेकानंद शाळेची असून 26 जानेवारीला संपूर्ण दिल्ली कडक सुरक्षा करण्यात आली होती असं असतानाही मुलाचं अपहरण होणं ही धक्कादायक बाब होती. नर्सरीचा हा विद्यार्थी आपल्या बहिणीसोबत सकाळी 7.30 वाजता शाळेत जात होता. यावेळी बसमध्ये जवळपास 15-20 विद्यार्थी होते.