क्रुरतेचा कळस| चांदीच्या कड्यासाठी 108 वर्षांच्या वृद्धेचे पाय कापले

मंदिरात गेलेली मुलगी घरी आली आणि समोरचं दृश्य पाहून हादरली

Updated: Oct 10, 2022, 06:50 PM IST
क्रुरतेचा कळस| चांदीच्या कड्यासाठी 108 वर्षांच्या वृद्धेचे पाय कापले title=

Jaipur Crime News: चोरीसाठी आरोपींनी 108 वर्षांच्या वृद्धेचा पाय कापल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. वृद्धेच्या मुलीने शेजारच्यांच्या मदतीने वृद्धेला रुग्णालयात दाखल केलं असून पोलिसांना याबाबत माहिती देण्यात आली आहे. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरु केला आहे. परिसरात लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही फुटेजच्या (CCTV) आधारे पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत. घटनास्थळावरुन पोलिसांनी एक चाकू जप्त केला आहे. 

राजस्थानमधली (Rajasthan) ही घटना असून मीणा कॉलनीमधल्या गलतागेट परिसरात 108 वर्षांची जमुना देवी नावाची महिला आपल्या मुलीसह रहाते. रविवारी सकाळी वृद्धेची मुलगी पहाटे साडेपाच वाजता घरानजीकच्या मंदिरात पूजा करण्यासाठी गेली. मुलगी जाताच आधीच दबा धरुन बसलेले चोरटे घरात शिरले. घरातील काही सामानाची त्यांनी लूट केली. यावेळी त्यांची नजर वृद्धेच्या पायातील चांदीच्या कड्यांवर गेलं. चांदीचे कडे चोरण्यासाठी त्यांनी चक्क वृद्धेचे पायच कापले. यानंतर चोरट्यांनी तिथून पळ काढला.

मंदिरातून मुलगी आल्यानंतर बसला धक्का
काही वेळाने वृद्धेची मुलगी घरी परतली. तिला आई घरात कुठेच दिसली नाही. म्हणून तिने आईचा शोध घेतला. तेव्हा बाथरुममध्ये वृद्धा रक्ताच्या थारोळ्यात पडलेली दिसली. वृद्धेचे दोन्ही पाय कापले होते आणि पायातील चांदीचे कडे गायब होते. हे भयानक दृष्य पाहून मुलीने आरडाओरडा सुरु केला. तिचा आवाज ऐकून आसपासच्या नागरिकांनी धाव घेतली. यानंतर वृद्धेला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं. 

पोलिसांनी सुरु केला तपास
या घटनेची माहिती नागरिकांनी पोलिसांनी दिली. पोलिसांनी तात्काळ घटनेची गंभीर दखल घेत तपास सुर केला. घटनास्थळावरुन पोलिसांना एक धारदार चाकू आढळून आला. तसंच सीसीटीव्हीच्या आधारे पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत. 

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x