अपघातात जखमी झाला, उपचारासाठी आला... पण पत्नी आणि प्रेमिकामध्ये हॉस्पिटलमध्ये भलताच राडा

पत्नी आणि प्रेयसी यांच्यात झालेल्या भांडणामुळे हॉस्पिटलमध्ये चांगलाच गोंधळ 

Updated: Sep 30, 2022, 09:03 PM IST
अपघातात जखमी झाला, उपचारासाठी आला... पण पत्नी आणि प्रेमिकामध्ये हॉस्पिटलमध्ये भलताच राडा title=

Trending News : अपघातात जखमी झालेल्या एका व्यक्तीला हॉस्पीटलमध्ये उपचारांसाठी दाखल करण्यात आलं. पण त्याची देखभाल कोणी करावी यावरुन हॉस्पिटलमध्येच पत्नी आणि त्याची प्रेयसी यांच्यात जबरदस्त राडा झाला. या व्यक्तीचं लग्न झालं असून त्याला दोन मुलंही आहेत. पण पहिल्या पत्नीला घटस्फोट न देता तो आपल्या प्रेयसीबरोबर रहात होता. 

काही दिवसांपूर्वी ती व्यक्ती रस्ते अपघातात जखमी झाला. याची माहिती मिळताच पत्नी सर्व भांडणं विसरुन त्याची देखभाल करण्यासाठी हॉस्पिटलमध्ये आली. पण त्याचवेळी त्याची प्रेयसीही तिथे पोहचली. दोघी आमने सामने आल्या आणि देखभाल कोणी करावी यावरुन त्यांच्यात हॉस्पिटलमध्येच जोरदार भांडणं सुरु झाली.

उत्तरप्रदेशमधल्या आझमगड इथलं हे प्रकरण आहे. जखमी व्यक्तीची पत्नी आणि प्रेयसी यांच्यात झालेल्या भांडणामुळे हॉस्पिटलमध्ये चांगलाच गोंधळ निर्माण झाला. हॉस्पिटलमधल्या इतर रुग्णांनाही याचा त्रास झाला.अखेर हॉस्पिटलमधल्या कर्मचाऱ्यांनी मध्यस्थी करत प्रकरण शांत केलं.

काय आहे प्रकरण?
आझमगडमधल्या बिलरियागंजमधल्या एका गावात रहाणाऱ्या एका विवाहित तरुणाचं एका मुलीबरोबर प्रेमसंबंध होते. त्या मुलीच्या पतीचं निधन झालं होतं. चार वर्षांपूर्वी हा तरुण आपली पत्नी आणि दोन मुलांना सोडून प्रेयसीबरोबर मुंबईला निघून गेला आणि मुंबईतच राहू लागला. त्यानंतर तरुणाने पत्नीबरोबर घटस्फोटासाठी न्यायालयात याचिका दाखल केली.

न्यायालयाने तरुणावर पोटगी म्हणून 3 लाख रुपये पत्नीला देण्याचे आदेश दिले होते. या प्रकरणाचा निकाल काही दिवसांवरच येऊन ठेपला होता. यासाठी तो तरुण मुंबईतून आझमगडमध्ये आला. पण एका रस्ता अपघातात तो जखमी झाला. आणि त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. याची माहिती मिळताच त्याची पत्नी आणि मुलं रुग्णालयात आले आणि त्याची देखरेख करु लागले. दुसरीकडे मुंबईत रहाणाऱ्या त्याच्या प्रेयसिलाही ही गोष्टी कळली आणि तीदेखील मुंबईहून आझमगडला हॉस्पिटलमध्ये त्याला पाहण्यासाठी आली.

पण हॉस्पिटलमध्ये पोहोचताच तिला तरुणाची पत्नी आणि मुलं तिथे असल्याचं दिसंलं आणि दोघींमध्ये भांडणं सुरु झाली.