गुजरातमध्ये Neeraj Chopra नं धरला गरब्यावर ठेका, सोशल मीडियावर Video Viral

सध्या नवरात्रोत्सव उत्साहात साजरा होता दिसत आहे. गुजरातमध्ये तर उत्साह शिगेला पोहोचला आहे. अशा उत्साहाच्या वातावरणात भालाफेकपटू नीरज चोप्राने (Neeraj Chopra) गुजरातमध्ये हजेरी लावली.

Updated: Sep 30, 2022, 08:22 PM IST
गुजरातमध्ये Neeraj Chopra नं धरला गरब्यावर ठेका, सोशल मीडियावर Video Viral title=

Neeraj Chopra Navratri Video Viral: सध्या नवरात्रोत्सव उत्साहात साजरा होता दिसत आहे. गुजरातमध्ये तर उत्साह शिगेला पोहोचला आहे. अशा उत्साहाच्या वातावरणात भालाफेकपटू नीरज चोप्राने (Neeraj Chopra) गुजरातमध्ये हजेरी लावली. भारताला ऑलिम्पिक स्पर्धेत ऐतिहासिक सुवर्णपदक मिळवून देणारा भालाफेकपटू नीरज चोप्रा गुजरातमध्ये पोहोचल्यावर त्याचे जंगी स्वागत करण्यात आले. यावेळी नीरज चोप्रा वडोदरात गरबा खेळताना दिसला. नीरज चोप्राचा हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांनीही नीरज चोप्राच्या डान्सचा व्हिडिओ शेअर केला आहे. 

मूळचा हरियाणाचा असलेला नीरज चोप्रा इतर वेळी ट्रॅक आणि फील्डमध्ये घाम गाळताना दिसतो. मात्र यावेळी तो त्याने गरबा नृत्यावर ठेका धरला. एवढेच नाही तर चाहत्यांसोबत मस्ती करताना दिसला. गरब्यानंतर नीरजने हजारोंच्या संख्येने उपस्थित असलेल्या चाहत्यांशी संवाद साधला. केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी व्हिडीओ पोस्ट करताना कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, ‘नीरज चोप्रावर गरब्याचा रंग चढला आहे. तू छान दिसत आहेस!’

नीरज चोप्राने दोन वेळा भालाफेकमध्ये स्वतःचाच राष्ट्रीय विक्रम मोडीत काढला आहे. नीरजने डायमंड लीग फायनलमध्ये 88.44 मीटरच्या सर्वोत्तम थ्रोसह यश संपादन केलं होतं. हे विजेतेपद पटकावणारा नीरज हा पहिला भारतीय खेळाडू आहे.