वर्ष संपताना 'बिग सेलिब्रेशन' करायचय ? अशी करा पैशांची व्यवस्था

 'ईयर एंड' सेलिब्रेशन करायचेच आहे तर काही टीप्स तुम्ही लक्षात ठेवायला हव्या. 

Pravin.Dabholkar Pravin Dabholkar | Updated: Dec 23, 2017, 10:29 AM IST
 वर्ष संपताना 'बिग सेलिब्रेशन' करायचय ? अशी करा पैशांची व्यवस्था  title=

मुंबई : २०१७ वर्ष संपायला आले आहे. प्रत्येकजण ईयर एन्डेडचा काहीनाकाही प्लान ठरवत आहे. जर तुमच्याकडे पैशांची कमतरता आहे आणि काहीही करुन 'ईयर एंड' सेलिब्रेशन करायचेच आहे तर काही टीप्स तुम्ही लक्षात ठेवायला हव्या.

ठिकाण ठरवा : 

प्रवासाला जाण्यापूर्वी ठिकाण प्लान करावे लागेल.त्यानंतर त्या प्रवासाला किती खर्च येईल याचा अंदाज लावता येऊ शकतो.

हॉटेलमध्ये थांबण्याचा खर्च, तिकीट बुकींग, खाण्या-फिरण्याच्या खर्चाचे प्लानिंग करता येऊ शकते.

फायनान्स :

 तरुणांमध्ये फिरण्याची क्रेझ दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामूळे ट्रॅव्हल ऑपरेटर्सनेही ईएमआय घेत मोठमोठ्या ट्रीप सुरू केल्या आहेत.

चांगले हॉलीडे पॅकेज घेऊन तुम्ही यात्रा करु शकता. परतल्यावर स्वस्त: ईएमआय देऊन पैसे रिटर्न करु शकता. यामूळे खिसा जास्त रिकामा होणार नाही.

म्युचुअल फंड :

म्युचुअल फंड बाजारातली गुंतवणुकीचे लोकप्रिय माध्यम आहे. यामध्ये इन्व्हेस्टर दरमहा एसआयपी (सिस्टेमॅटीक इन्व्हेस्टमेंट प्लान) माध्यमातून मोठी रक्कम जोडू शकतात. मग याचा उपयोग फिरण्यासाठी करु शकता.

जुन्या डिपॉझिटचा उपयोग :

 जर पुर्वीपासून तुमच्याकडे थोडेफार पैसे असतील वॅकेशनवर खर्च करु शकता. यामूळे तुम्ही लोनच्या कटकटीपासून मुक्ती मिळवू शकता.