cyrus mistry: व्यापार जगतातील मोठं नाव सायरस मिस्त्री इतक्या संपत्तीचे होते मालक

सायरस मिस्त्री यांच्या निधनाने व्यापार जगतावर शोककळा पसरली आहे.

Updated: Sep 4, 2022, 04:50 PM IST
cyrus mistry: व्यापार जगतातील मोठं नाव सायरस मिस्त्री इतक्या संपत्तीचे होते मालक title=

मुंबई : सायरस मिस्त्री यांचं आज अपघातात निधन (cyrus mistry killed in Road accident) झालं आहे. सायरस मिस्‍त्री टाटा समुहाचे (Tata Group) माजी चेअरमन होते. टाटा समूहाने त्यांना चेअरमन पदावरून हटविले होते. त्यानंतर पुन्हा रतन टाटा (Ratan Tata) यांनी सूत्रे हाती घेतली होती. सायरस मिस्‍त्री यांना नेमकं का बाजुला करण्यात आलं याचा खुलासा झाला नाही. पण यानंतर त्यांनी कोर्टात धाव घेतली होती. 

सायरस मिस्त्री हे बिजनेस वर्ल्डमध्ये एक मोठं नाव होतं. सायरस मिस्त्री हे पालोनजी मिस्त्री (Pallonji Mistry) यांचे पूत्र होते. त्यांचे देश-विदेशात अनेक प्रोजेक्ट्स आहेत. मूळ गुजराती आणि नंतर आर्यलंड निवासी असलेले पालोनजी मिस्त्री हे बांधकाम क्षेत्रात मोठं नाव आहे. 

सायरस मिस्त्री यांच्याकडे फोर्ब्सच्या माहितीनुसार 14 बिलियन डॉलर (सुमारे 90 हजार कोटी रूपये) च्या संपत्ती आहे. पालोनजी मिस्त्रींच्या आजोबांनी 1865 मध्ये कंस्ट्रक्शन कंपनी सुरु केली होती. मागील दीडशे वर्षापासून बांधकाम व्यवसायात असलेल्या या कंपनीने देश-विदेशात अनेक शानदार प्रोजेक्ट्स पूर्ण केले आहेत.

Shapoorji Pallonji Group Chairman Pallonji Mistry dies at 93 | Companies  News | Zee News

गुजरातमधील वेसा गावात जन्मलेले पालोनजी यांची पत्नी आयरिश होती. त्यामुळे ते आर्यलंडचे नागरिक बनले. त्याचा मोठा मुलगा शापूरजी मिस्त्री देखील कंस्ट्रक्शन कंपनी चालवतात.लहान मुलगा सायरस मिस्त्री टाटा समूहाचे चेअरमन बनले होते. पण नंतर त्यांना पदावरुन हटवण्यात आले.

ओमानचे सुल्तान यांचा पॅलेस सुद्धा पालोनजी यांच्या कंपनीने डिझाईन केला होता. जगभरात अनेक मोठे इमारती त्यांनी बांधल्या आहेत.