ISRO Recruitment 2024: भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्रोमध्ये नोकरी करण्याची अनेकांची इच्छा असते. पण भरती कधी निघते? त्यासाठी काय पात्रता असते? अशा गोष्टी अनेकांना माहिती नसतात. तुम्हीदेखील यापैकी एक असाल तर तुमच्यासाठी ही महत्वाची अपडेट आहे. कारण इस्रोमध्ये विविध पदांची भरती केली जाणार आहे. या रिक्त पदांवर निवड झालेल्या उमेदवारांना 2 लाखांहून अधिक पगार मिळणार आहे. अधिकृत वेबसाइटवर यासंदर्भात नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले असून पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, अर्जाची शेवटची तारीख, पगार याचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे.
या भरतीतून एकूण 103 पदे भरली जाणार आहेत. या रिक्त पदांमध्ये वैद्यकीय अधिकारी - SD, वैज्ञानिक अभियंता - SC, तांत्रिक सहाय्यक, वैज्ञानिक सहाय्यक, तंत्रज्ञ - B, ड्राफ्ट्समन - B आणि सहाय्यक (राजभाषा) या पदांचा समावेश आहे. इस्रोच्या या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे.
वैद्यकीय अधिकारी (SD) पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 18 वर्षे ते 35 वर्षेांदरम्यान असावे. वैद्यकीय अधिकारी (SC) पदासाठी उमेदवाराचे वय 18 वर्षे ते 35 वर्षेांदरम्यान असावे.वैज्ञानिक अभियंता (SC) साठी उमेदवाराचे वय 18 वर्षे ते 30 वर्षेांदरम्यान असावे.तांत्रिक सहाय्यक पदासाठी उमेदवाराचे वय 18 वर्षे ते 35 वर्षेांदरम्यान असावे. वैज्ञानिक सहाय्यकसाठी उमेदवाराचे वय 18 वर्षे ते 35 वर्षेांदरम्यान असावे. तंत्रज्ञ (बी)पदासाठी उमेदवाराचे वय 18 वर्षे ते 35 वर्षेांदरम्यान असावे.ड्राफ्ट्समन (बी) साठी उमेदवाराचे वय 18 वर्षे ते 35 वर्षेांदरम्यान असावे. सहाय्यक (राजभाषा) साठी उमेदवाराचे वय 18 वर्षे ते 35 वर्षेांदरम्यान असावे.यासह SC आणि ST उमेदवारांना कमाल वयोमर्यादेत 5 वर्षे आणि OBC उमेदवारांसाठी कमाल वयोमर्यादेत 3 वर्षांची सवलत देण्यात आली आहे.
इस्रोमध्ये नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे मान्यताप्राप्त विद्यापीठातून एमबीबीएसची डीग्री असणे आवश्यक आहे. तसेच त्याच्याकडे संबंधित कामाचा किमान 2 वर्षांचा अनुभव असावा.
इस्रोची अधिकृत वेबसाइट isro.gov.in वर जाऊन तुम्ही अर्ज करू शकता. या विविध पदांवर निवड झालेल्या उमेदवारांना त्यांच्या पदानुसार दरमहा 21 हजार 700 ते 2लाख 8 हजार 700 रुपये इतका पगार दिला जाईल.
या रिक्त पदांसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांना 9 ऑक्टोबर किंवा त्यापूर्वी अर्ज करावा लागणार आहे. तुम्हालाही इथे नोकरी करायची असेल तर खाली दिलेल्या सर्व गोष्टी काळजीपूर्वक वाचा.